लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार-2017 : रणबीर कपूर ठरला आऊटस्टॅडिंग एन्टरटेनर आॅफ द इयर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2017 21:08 IST2017-04-11T14:55:04+5:302017-04-11T21:08:22+5:30
अभिनेता रणबीर कपूरला लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार-2017 मधील आऊटस्टॅडिंग एन्टरटेनर आॅफ द इयर (पुरुष) कॅटेगरीतील पुरस्काराने गौरविण्यात ...
.jpg)
लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार-2017 : रणबीर कपूर ठरला आऊटस्टॅडिंग एन्टरटेनर आॅफ द इयर
अ िनेता रणबीर कपूरला लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार-2017 मधील आऊटस्टॅडिंग एन्टरटेनर आॅफ द इयर (पुरुष) कॅटेगरीतील पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर ‘कसं काय मुंबई’अशी साद रणबीरने घातली. मुंबईनेच मला घडवल, असे सांगत त्याने लोकमतचे विशेष आभार मानले.
कपूर खानदानसारखं अभिनय आणि कलेचे मोठं विद्यापीठ असलेल्या घरात त्याचा जन्म झाला. आपल्या दिग्गजांकडून मिळालेला अभिनयाचा वारसा चालवण्यासाठी ‘सावरियाँ’ बनून तो रुपेरी पडद्यावर अवतरला. आपल्या पहिल्याच सिनेमासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवत ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या लेकानं रसिक आणि तरुणाईवर गारुड घालण्यास सुरुवात केली. पहिल्याच सिनेमात मिळालेल्या यशानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. रुपेरी पडद्यावर वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा आणि तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनलेला हा अभिनेता म्हणजे रणबीर कपूर. ‘सावरियाँ’ सिनेमाला मिळालेल्या यशानंतर ‘बचना ऐ हसीनो’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘वेकअप सिड’, ‘रॉकेट सिंग’, ‘रॉकस्टार’, ‘बर्फी’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘बेशरम’, ‘बॉम्बे वेल्वेट’, ‘तमाशा’, ‘ऐ दिल है मुश्किल’ अशा सिनेमांमधून आपल्या अभिनयानं तरुणाईची मनं जिंकली. आजच्या घडीला तरुणींचा लाडका अभिनेता म्हणून रणबीर कपूर प्रसिद्ध आहे. आज रसिक त्याच्या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळेच त्याच्या या अफाट लोकप्रियतेचा गौरव करण्यासाठी लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार-2017 मधील आऊटस्टॅडिंग एन्टरटेनर आॅफ द इयर (पुरुष) कॅटेगरीतील पुरस्काराने रणबीरला गौरवण्यात आले.