/> लोकमत आयोजित धमाल गल्ली या कार्यक्रमामध्ये तरुणींच्या गळ््यातील ताईत बनलेला सगळ््यांचा लाडका दगडु याने मनमुराद डान्स करुन एकदम कल्ला केला आसे म्हणायला खरतर काहीच हरकत नाही. प्रथमेशने सध्याच्या हिट्स साँग्जवर ठेका धरीत उपस्थित तरुणांना देखील नाचविले. झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर तर प्रथमेशला एवढी झिंग चढली कि त्याने सर्वकाही विसरुन एकदम तुफान डान्स केला. लोकमतच्या धमाल गल्लीमध्ये रस्त्यावर उतरुन एकदम बिनधास्तपणे स्ट्रीट डान्स केला जातो तर स्टेजवर ट्रेनर झुंबा अन बॉलीवुड डान्सच्या स्टेप्स देखील शिकवितात. परदेशामध्ये ही कन्सेप्ट फेमस असुन आता लोकमतने देखील पुढाकार घेऊन तरुणांपासुन ते आजी-आजोबांपर्यंत सगळ््यांनाच रस्त्यावर उतरविले असुन एकदम डिसिप्लिनमध्ये हा डान्स केला जातो. यंदाच्या धमाल गल्लीत ३५ टक्के काठावर पास या चित्रपटाच्या टिमने तरुणांसोबत ठुमके लावले व टोटल धमाल मस्ती केली.
![]()