Lockdown Effect : 'जाने कहा गए वो दिन' म्हणत फ्लॅशबॅकमध्ये गेली सोनाली कुलकर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 15:26 IST2021-04-24T15:26:20+5:302021-04-24T15:26:49+5:30
लॉकडाउनमुळे सध्या सोनाली कुलकर्णी घरी असून नुकतीच तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे, जी व्हायरल होते आहे.

Lockdown Effect : 'जाने कहा गए वो दिन' म्हणत फ्लॅशबॅकमध्ये गेली सोनाली कुलकर्णी
कोरोना व्हायरसचे वाढते संकट पाहता सध्या महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. तसेच शूटिंगलाही मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे काही वाहिन्यांच्या मालिकांचे शूटिंग सध्या इतर राज्यांमध्ये होत आहे. तर काही कलाकार सध्या घरातच आहेत. दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर विना मेकअपमधील फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सोनाली कुलकर्णी हिने इंस्टाग्रामवर तिचे काही विनामेकअप लूकमधील फोटो शेअर करत लिहिले की, 'जाने कहा गए वो दिन'. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
सोनाली कुलकर्णी आज मराठी चित्रपटसृष्टीत आपले एक वेगळे अस्तित्वच निर्माण केले आहे. सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सोनाली तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.
सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब सोनालीकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.
लवकरच तिचा झिम्मा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.कोरोनामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलीये.. तर 'छत्रपती ताराराणी' आणि फ्रेश लाईम सोडा हे दोन सिनेमे सुद्धा सोनालीनं साईन केलेत.. ज्याचा फर्स्ट लूक तिनं इंस्टाग्रामवर शेअर करत याबाबत चाहत्यांना माहिती दिली होती.