महाराष्ट्राचे खरे 'बिग बॉस' कोण? निवेदिता सराफ यांनी दिलं मन जिंकणारं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:56 IST2026-03-12T13:56:15+5:302026-03-12T13:56:45+5:30

निवेदिता सराफ यांच्या मते 'हे' आहेत महाराष्ट्राचे खरे बिग बॉस; स्पष्टपणे व्यक्त केलं मत

Lmoty 2026 Nivedita Saraf On Real Maharashtrian And Big Boss Of Maharashtra | महाराष्ट्राचे खरे 'बिग बॉस' कोण? निवेदिता सराफ यांनी दिलं मन जिंकणारं उत्तर

महाराष्ट्राचे खरे 'बिग बॉस' कोण? निवेदिता सराफ यांनी दिलं मन जिंकणारं उत्तर

Nivedita Saraf : ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी गेली अनेक वर्ष विविध नाटकं, मालिका, चित्रपटांतून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे. त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध विषयांवर त्या नेहमीच स्पष्टपणे आपलं मत मांडताना दिसतात. अशातच  १० मार्च रोजी भारताचे प्रवेशद्वार अशी ओळख असणाऱ्या 'गेटवे ऑफ इंडिया' येथे पार पडलेल्या  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६'  पुरस्कार सोहळ्यात निवेदिता यांनी महाराष्ट्राचे खरे 'बिग बॉस' कोण आहेत, याबद्दल आपलं मत व्यक्त केलं.

यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर - जीवनगौरव' पुरस्काराने अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री पुरस्कारांनंतर अशोक सराफ यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. या खास क्षणी अशोक सराफ यांच्यासोबत त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ उपस्थित होत्या. याच कार्यक्रमात लोकमतशी त्यांनी खास संवाद साधला.

 "तुमच्या मते खरा महाराष्ट्रीयन कोण?" असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अतिशय सुंदर उत्तर देताना निवेदिता सराफ म्हणाल्या, सगळेच महाराष्ट्रातील खरे महाराष्ट्रीयन आहेत. नुसती जन्मभूमी नाही तर ज्यांची ही कर्मभूमी आहे, ज्यांच्या मनात राज्याबद्दल आणि या मराठी भाषेबद्दल आदर आहे, ते सर्व महाराष्ट्रीयन आहेत". पुढे त्यांना "तुमच्या मते महाराष्ट्राचे खरे 'बिग बॉस' कोण आहेत?' असं विचारलं. त्यावर हसत उत्तर देताना निवेदिता सराफ म्हणाल्या, "प्रत्येक महाराष्ट्रीयन हा बिग बॉसच आहे". 


Web Title : निवेदिता सराफ ने बताया महाराष्ट्र का असली 'बिग बॉस' कौन है।

Web Summary : निवेदिता सराफ का मानना है कि हर महाराष्ट्रीयन जो राज्य और मराठी भाषा का सम्मान करता है, 'बिग बॉस' है। उन्होंने लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवार्ड्स में बात की, जहाँ उनके पति, अशोक सराफ को लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड मिला।

Web Title : Nivedita Saraf reveals who is Maharashtra's real 'Big Boss'.

Web Summary : Nivedita Saraf believes every Maharashtrian who respects the state and Marathi language is a 'Big Boss.' She spoke at the Lokmat Maharashtrian of the Year awards, where her husband, Ashok Saraf, received a lifetime achievement award.