'लायन' या हॉलिवुड चित्रपटात झळकणार हा मराठमोळा मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 17:17 IST2016-12-28T14:13:20+5:302016-12-28T17:17:59+5:30

'लायन'मध्ये या हॉलिवूड चित्रपटात आठ वर्षाचा मराठमोळा मुलगा सनी पवार हा झळकणार आहे. गार्थ डेव्हीस दिग्दर्शित हा चित्रपट आहे. ...

'Lion' is a Maratha boy who will be seen in the Hollywood film | 'लायन' या हॉलिवुड चित्रपटात झळकणार हा मराठमोळा मुलगा

'लायन' या हॉलिवुड चित्रपटात झळकणार हा मराठमोळा मुलगा

'
;लायन'मध्ये या हॉलिवूड चित्रपटात आठ वर्षाचा मराठमोळा मुलगा सनी पवार हा झळकणार आहे. गार्थ डेव्हीस दिग्दर्शित हा चित्रपट आहे. सनी पवारने या चित्रपटात अप्रतिम काम केले आहे. निकोल किडमॅन यांची भूमिका असलेल्या 'लायन' चित्रपटाची 'गोल्डन ग्लोब अवॉर्ड'साठी चार कॅटॅगिरीमध्ये निवड झाली आहे. तसेच सनी पवारची निवडदेखील ८००० मुलांच्या आॅडिशनमधून करण्यात आली होती. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेला, इंग्रजी भाषा कळत नसलेल्या सनीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.  'लायन' या चित्रपटात त्याने सरु ही व्यक्तीरेखा साकारली आहे. भारतात घडलेल्या सत्यकथेवर आधारित हा चित्रपट आहे. आपल्या भावासह रेल्वे स्टेशनवर पोहोचलेला पाच वर्षाचा गरीब सरू हा मुलगा चुकून रेल्वेमध्ये झोपतो आणि गाडी सुटते. जाग येते तेव्हा तो खूप लांब पोहोचलेला असतो. अशा तºहेने तो कोलकात्याला पोहोचतो. त्याचा भाऊ शोध घेतो पण सापडणे अशक्य. कोलकात्याच्या रस्त्यावर पाच वषार्चा सरू भटकत असतो. जगण्यासाठी खूप संघर्ष त्याला करावा लागतो. त्यानंतर एक आॅस्ट्रेलियन कुटुंब त्याला दत्तक घेते. २५ वषार्नंतर तो आपल्या हरवलेल्या कुटुंबियांचा शोध घ्यायला सुरूवात करतो अशी या चित्रपटाची कथा आहे. तसेच 'गोल्डन ग्लोब अवॉर्ड'साठी 'लायन'ची निवड झाली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रॉनी मारा आणि अभिनेता देव पटेल या कलाकारांचादेखील समावेश आहे. तसेच दिप्ती नवल, तनिष्ठा चटर्जी, प्रियंका बोस आणि नवाजुद्दीन सिद्दीकी हे कलाकारांचादेखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 






 

Web Title: 'Lion' is a Maratha boy who will be seen in the Hollywood film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.