लाँग ड्राइव्ह पे चल... मराठमोळ्या लूकमध्ये रिंकू राजगुरुने चालवली गाडी, व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 16:57 IST2023-05-16T16:56:51+5:302023-05-16T16:57:18+5:30
Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो चर्चेत आला आहे.

लाँग ड्राइव्ह पे चल... मराठमोळ्या लूकमध्ये रिंकू राजगुरुने चालवली गाडी, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी ‘आर्ची’ अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हे नाव कोणालाही नवीन राहिलेलं नाही. आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू ही कायमच चर्चेत असते. रिंकू सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला. जो चर्चेत आला आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती साडीत गाडी चालवताना दिसत आहेत. जांभळ्या रंगाची साडी, नाकात नथ, कानात झुमके, हातात हिरव्या बांगड्या अशा पारंपारिक लूकमध्ये रिंकू पाहायला मिळत आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ठिकाणाशिवाय लाँग ड्राइव्हला जाऊया.
रिंकूच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. एका युजरने लिहिले की, मराठी मुलगी. तर दुसऱ्या युजरने म्हटले की, बुलेट, ट्रॅक्टर, कार...आता फक्त एअरप्लेन चालवायचं राहिलंय. आणखी एका युजरने लिहिले की, सैराटमधी ट्रॅक्टर चालवायची बुलेट पण चालवायची आणि आत्ता फोर व्हिलर वा आर्चे.
वर्कफ्रंट...
दरम्यान, सैराट चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या रिंकू राजगुरूने कागर, मेकअप अशा काही मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर, ओटीटीवरही तिने पदार्पण केले असून वेबसीरिजमध्येही काम केले आहे.