​जाणून घ्या सचिन पिळगांवकर यांना शोले या चित्रपटासाठी किती मानधन मिळाले होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 11:29 IST2017-08-17T05:59:03+5:302017-08-17T11:29:03+5:30

सचिन पिळगांवकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९५७ला मुंबईत झाला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी कधीही न ऐकलेल्या काही ...

Learn how Sachin Pilgaonkar got the award for Sholay | ​जाणून घ्या सचिन पिळगांवकर यांना शोले या चित्रपटासाठी किती मानधन मिळाले होते

​जाणून घ्या सचिन पिळगांवकर यांना शोले या चित्रपटासाठी किती मानधन मिळाले होते

िन पिळगांवकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९५७ला मुंबईत झाला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी कधीही न ऐकलेल्या काही गोष्टी...
सचिन पिळगांकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. शोले या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या अहमद या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. तुम्हाला माहीत आहे का की, शोले या चित्रपटात काम करण्यासाठी सचिन पिळगांवकर यांना किती मानधन मिळाले होते. या चित्रपटासाठी सचिन पिळगांवकर यांना केवळ एक फ्रिज मानधन म्हणून मिळाला होता. तुम्हाला आश्चर्य वाटले ना... पण हे खरे आहे, इंडिया डॉट कॉम या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार शोले या चित्रपटात काम करण्यासाठी त्यांना मानधन म्हणून चित्रपटाच्या टीमने केवळ फ्रिज दिला होता.
सचिन पिळगांकर यांनी एक बालकलाकार म्हणून त्यांच्या करियरला सुरुवात केली. हा माझा मार्ग एकला या त्यांच्या पहिल्याच चित्रपटातील भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यानंतर त्यांनी ब्रम्हचारी, ज्वेल थिफ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकाराच्या भूमिका साकारल्या. बालकलाकाराच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता मोठा झाल्यानंतर एक यशस्वी अभिनेता होऊ शकत नाही असे म्हटले जाते. पण त्यांनी ही गोष्ट चुकीची ठरवली. गीत गाता चल, अखियों के झरोको से, नदीया के पार, बालिका वधू यांसारखे त्यांनी एकाहून एक हिट चित्रपट दिले. त्यांनी शोले, त्रिशूल, सत्ते पे सत्ता यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अशी ही बनवा बनवी, आयत्या घरात घरोबा, नवरी मिळे नवऱ्याला यांसारखे अनेक हिट चित्रपट त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारण्यासोबतच त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. सचिन पिळगांवकर यांनी आज एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, गायक म्हणून बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. तू तू मैं मैं, हद कर दी यांसारख्या दर्जेदार हिंदी मालिकांची त्यांनी निर्मिती केली आहे. सचिन पिळगांकर आणि त्यांची पत्नी सुप्रिया पिळगांवकर यांनी नच बलिये या डान्सिंग रिअॅलिटी शोचे विजेतेपद देखील मिळवले आहे.

Also Read : सचिन पिळगांवकर कैदी बँड या चित्रपटात पोलिसांच्या भूमिकेत

Web Title: Learn how Sachin Pilgaonkar got the award for Sholay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.