'ससुराल हो तो ऐसा..!' म्हणत मानसी नाईकने शेअर केला सासरचा 'तो' व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 16:51 IST2021-02-12T16:50:48+5:302021-02-12T16:51:45+5:30
मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे.

'ससुराल हो तो ऐसा..!' म्हणत मानसी नाईकने शेअर केला सासरचा 'तो' व्हिडीओ
मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे. लग्नानंतर ती प्रदीप खरेराच्या गावी फरीदाबादला गेली होती. नुकतेच ते दोघे मुंबईत परतले आहेत. दरम्यान मानसी आणि प्रदीप एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच मानसीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ फरीदाबादचा आहे.
मानसी नाईक हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ फरीदाबाद असून तिथे शेतातील लिंबूच्या झाडावरून लिंबू तोडताना ती दिसते आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ससुराल हो तो ऐसा..दुल्हन वही अच्छी जो पिया मन भाये, ससुराल वही अच्छी जहाँ मायके की याद न आये...लव्ह यू इंडिया. ये भारत की बेटी है, दोनो मेरे अपने है..माझा महाराष्ट्र आणि खूप प्रेम माझ्या हरियाणाला.
मानसीचा नवरा प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता आणि मॉडेल आहे. प्रदीप त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो. तो इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असतो. त्याला इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक जण फॉलो करतात. प्रदीपच्या लूक्सवर त्याचे चाहते चांगलेच फिदा आहेत.
मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत. याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसीने आपल्या अभिनयाद्वारे रसिकांची मनं जिंकली आहेत.
एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.