एकांकिकाच्या माध्यमातून खुलवले चिमुकल्यांच्या चेहºयावर हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 13:09 IST2017-02-27T07:39:27+5:302017-02-27T13:09:27+5:30

नाटक, मालिका असो या चित्रपट अशा अनेक माध्यमातून मोठया प्रमाणात जनजागृती करण्यास मदत होते. त्याचबरोबर प्रेक्षकांच्या चेहºयावर हसू खुलवण्यास ...

Laugh at the faces of the tongs that opened through monogamous | एकांकिकाच्या माध्यमातून खुलवले चिमुकल्यांच्या चेहºयावर हसू

एकांकिकाच्या माध्यमातून खुलवले चिमुकल्यांच्या चेहºयावर हसू

टक, मालिका असो या चित्रपट अशा अनेक माध्यमातून मोठया प्रमाणात जनजागृती करण्यास मदत होते. त्याचबरोबर प्रेक्षकांच्या चेहºयावर हसू खुलवण्यास हे माध्यम अधिक उपयोगी पडते. म्हणूनच कलाविष्कार या नाटयसंस्थेच्यावतीने माहेर या अनाथ आणि निराधार लोकांसाठी दोन एकांकिका नुकत्याच सादर करण्यात आल्या आहेत. यामध्ये अनिल सोनार यांनी लिहिलेली भानगड पहावी लपवून आहे तर दुसरी एकांकिका रामचंद्र राजे यांची कोणीही कोणाचे नाही हि आहे. या दोन्ही एकांकिकांचे दिग्दर्शन 'समर सुयोग' यांनी केले आहे. यामध्ये एक विनोदी व एक बोधपूर्ण एकांकिका आहे.
         
        बायकोच्या गैरसमजामुळे खोलीत कोडून ठेवल्या गेलेल्या नटीला बाहेर काढण्यासाठी काय काय केले जाते, आणि ते करत असताना, आयुष्यात एकाचा दिवशी कश्या घटना घडतात, आणि इतर लोक त्याचा कसा फायदा घेतात, आणि शेवटी कोण कोणाला मदत करते यावर आधारित भानगड पहावी लपवून ही एकांकिका आहे. 
           
          तर आयुष्य जगताना आपण मी, माझे, माज्यासाठी करत राहतो, आपल्याला काहीवेळा गर्व पण होतो आणि आपल्या आप्तेष्टांना आपला खूप अभिमान आहे असे वाटत असते,  पण काय आपल्या मृत्यूव नंतर देखील ते तसेच राहते का?, हे सत्य दाखवणारी कोणीही कोणाचे नाही हि बोधपूर्ण एकांकिका आहे. 
           
           यात प्रकाशयोजना राहुल लामखेडे व रंगभूषा नरेंद्र वीर यांची आहे, तर तुषार गिजरे, देव जोशी, आरती गोगटे, वृंदा गोगटे, सारिका भालेराव, सविता इंगळे, सीमा पोंक्षे, अश्विनी मरगळे, दीपक कराड, संदीप म्हाळसकर, सचिन राजपुरे, विशाल डोंगरे यांनी अभिनय केला आहे.


Web Title: Laugh at the faces of the tongs that opened through monogamous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.