अभिनेता-अभिनेत्रीचा वाढदिवस एकाच दिवशी; आणि त्याच दिवशी प्रदर्शित होणार त्यांचा चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 15:56 IST2025-09-11T15:55:42+5:302025-09-11T15:56:11+5:30

बर्थडे बॉय आणि बर्थडे गर्लचा डबल धमाका!

Lalit Prabhakar Hruta Durgule Aarpar Movie Releasing On 12th September Their Birthdays On The Same Day | अभिनेता-अभिनेत्रीचा वाढदिवस एकाच दिवशी; आणि त्याच दिवशी प्रदर्शित होणार त्यांचा चित्रपट!

अभिनेता-अभिनेत्रीचा वाढदिवस एकाच दिवशी; आणि त्याच दिवशी प्रदर्शित होणार त्यांचा चित्रपट!

वाढदिवस आणि चित्रपट प्रदर्शन एकाच दिवशी असणं हा एक दुर्मिळ योगायोग आहे. जो मराठी चित्रपटसृष्टीतील दोन कलाकारांच्या आयुष्यात जुळून आला आहे.  लोकप्रिय अभिनेत्री आणि  तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या अभिनेत्याचा वाढदिवस हा एकाच दिवशी असतो. ही ऑनस्क्रीन मराठमोळी सेलिब्रेटी जोडी १२ सप्टेंबरला वाढदिवस साजरा करते.   विशेष म्हणजे, या दोघांनी एकत्र काम केलेला चित्रपट त्यांच्या वाढदिवसाच्याच दिवशी प्रदर्शित होत आहे. तर ती लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडी कोणती आहे, याबद्दल आपण जाणून घेऊयात.

तर मराठी चित्रपटसृष्टीतील ती लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडी ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) आणि हृता दुर्गुळे (Hruta Durgule) यांची आहे.  १२ सप्टेंबर रोजी ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे यांचा दोघांचाही वाढदिवस असतो. येत्या १२ सप्टेंबर रोजी या दोघांचा 'आरपार' (Aarpar Movie ) हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

'आरपार'चित्रपटाचा ट्रेलर, गाण्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.  प्रेमाची अनोखी परिभाषा मांडणारा हा एक रोमँटिक सिनेमा आहे. त्यांनी या चित्रपटात अमर-प्राची या भूमिका साकारल्या आहेत. ललित आणि हृता यांच्या केमिस्ट्रीने आधीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, त्यामुळे  'आरपार' या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असून त्यांची ऑनस्क्रीन जोडी पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. वाढदिवशी चित्रपट प्रदर्शित होत असल्यानं त्यांच्या या खास दिवसाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. 


Web Title: Lalit Prabhakar Hruta Durgule Aarpar Movie Releasing On 12th September Their Birthdays On The Same Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.