'गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हल'चा 'लाल इश्क' ने होणार शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 12:59 IST2016-06-03T07:29:36+5:302016-06-03T12:59:36+5:30

२००८ सालापासून सुरु करण्यात आलेल्या ‘गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हल’चे यंदाचे ९वे वर्ष आहे.  वेगवेगळ्या पठडीतील मराठी चित्रपट या महोत्सवात ...

Lal Ishq's 'Goa Marathi Film Festival' will be inaugurated | 'गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हल'चा 'लाल इश्क' ने होणार शुभारंभ

'गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हल'चा 'लाल इश्क' ने होणार शुभारंभ

tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">२००८ सालापासून सुरु करण्यात आलेल्या ‘गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हल’चे यंदाचे ९वे वर्ष आहे.  वेगवेगळ्या पठडीतील मराठी चित्रपट या महोत्सवात दाखवले जातात. 

आज दिनांक ३ जून रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान ‘गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हल’चे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री माननीय लक्ष्मीकांत पार्सेकर, माननीय आमदार व कला अकादमीचे अध्यक्ष विष्णु वाघ आणि दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीनानाथ मंगेशकर सभागृह येथे होणार आहे.

संजय लीला भंसाळी यांचा मराठी सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट ‘लाल इश्क’ च्या स्क्रिनिंगने ९ व्या गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हलचा शुभारंभ ७ वाजता होणार आहे. ससपेन्स, थ्रिलर आणि रोमॅन्स पठडीतला ‘लाल इश्क’ हा चित्रपट पाहायला गोवेकर नक्कीच आतुर असतील.

Web Title: Lal Ishq's 'Goa Marathi Film Festival' will be inaugurated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.