'लागिरं झालं जी'मधली शीतलीने केला झक्कास डान्स, सोशल मीडियावर VIDEO होतेय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 19:31 IST2022-01-06T12:33:54+5:302022-01-06T19:31:26+5:30

शीतली (Shitali) व्हिडीओमध्ये व्हाईट कलरच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहे.

lagira zhala ji fame shitali aka shivani baokar dance on trendig song see video | 'लागिरं झालं जी'मधली शीतलीने केला झक्कास डान्स, सोशल मीडियावर VIDEO होतेय व्हायरल

'लागिरं झालं जी'मधली शीतलीने केला झक्कास डान्स, सोशल मीडियावर VIDEO होतेय व्हायरल

छोट्या पडद्यावरील 'लागिर झालं जी'  (Lagira Zhala Ji)  मालिकेतील अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani Baokar)हिने मोठ्या खुबीने शीतली (Shitali) ही भूमिका साकारली होती. तिचा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. सोशल मीडियावर सध्या बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. शिवाय सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असते.शिवानी तिच्या डान्स व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. ध्वनी भानुशालीचं नवं गाणं रिलीज झालंय जे सोशल मीडियावर ट्रेंड होतंय. या गाण्यावर शीतली जबरदस्त डान्स करताना दिसतेय. तिचा हा व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवानी बावकर 'खो गयी मैं' या गाण्यावर जबरदस्त डान्स मूव्ह्स करत आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड पसंत केला जात आहे. 

 शिवानी बावकर या व्हिडीओमध्ये व्हाईट कलरच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करताच तिच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्स यायला सुरुवात झाली आहे. चाहते तिच्या डान्स मूव्ह्सच आणि सौंदर्याचं कौतुक करत आहेत.

अभिनय क्षेत्रात येण्याआधी शिवानीने जर्मन ट्रान्सलेटर म्हणूनही एका आयटी कंपनीत काम केले आहे. कॉलेजमध्ये असताना जर्मन भाषा ऑप्शनल म्हणून निवडली होती.ती शिकत असताना शिवानीने ती चटकन आत्मसात केली. शिकताना जर्मन भाषेबाबत आवड निर्माण झाली. त्यामुळे जर्मन भाषा शिकण्याच्या विविध लेव्हल्स तिने पार केल्या. त्यामुळेच मराठी, हिंदी, इंग्रजीप्रमाणेच शिवानी जर्मन भाषाही तितक्याच फाडफाडपणे आणि बिनधास्तपणे बोलू शकते.त्यामुळे शीतली साकारण्याआधी तिने एका आयटी कंपनीत जर्मन ट्रान्सलेटर म्हणून कामही केलं होतं.

Web Title: lagira zhala ji fame shitali aka shivani baokar dance on trendig song see video