क्षिती जोगचं फेसबुक पेज झालं हॅक, अभिनेत्री म्हणाली - "अशा पोस्टकडे दुर्लक्ष करावे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 17:15 IST2023-08-19T17:15:33+5:302023-08-19T17:15:59+5:30
Rocky Aur Rani Ki Prem Kahani : करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटामुळे मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग खूप चर्चेत आली आहे. या चित्रपटातील तिच्या कामाचे सर्वत्र खूप कौतुक होत आहे.

क्षिती जोगचं फेसबुक पेज झालं हॅक, अभिनेत्री म्हणाली - "अशा पोस्टकडे दुर्लक्ष करावे..."
करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटामुळे मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग खूप चर्चेत आली आहे. या चित्रपटातील तिच्या कामाचे सर्वत्र खूप कौतुक होत आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर ती आणखी चर्चेत आली आहे. मात्र आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिचे फेसबुक अकाउंट हॅक झाले आहे. खुद्द तिनेच ही माहिती इंस्टाग्रामवर दिली आहे.
अभिनेत्री क्षिती जोगने इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करुन तिचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे सांगितले. तिने या पोस्टमध्ये म्हटले की, चलचित्र मंडळीची निर्माती, अभिनेत्री क्षिती जोश यांचे फेसबुक पेज हॅक करण्यात आले आहे. पेजवरून काही अश्लील व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. फॉलोवर्सना विनंती आहे की, अशा पोस्टकडे दुर्लक्ष करावे. आम्ही पेज पुन्हा सुरळीत होण्यासाठी कार्यरत आहोत. तरी प्रेक्षकांनी, चाहत्यांनी संयम ठेवावा, हीच विनंती. आपल्या मनोरंजनासाठी सदैव तत्पर चलचित्र मंडळी.
करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात क्षिती जोग महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे. या चित्रपटात तिने रणवीर सिंहच्या आईची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील क्षितीच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. या चित्रपटात जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आझमी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.