"पाटलीणबाई आज तुमचा जन्म झाला नसता तर...", हेमंत ढोमेच्या क्षिती जोगला हटके शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 14:15 IST2025-01-01T14:13:31+5:302025-01-01T14:15:02+5:30

आज क्षिती जोग आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने संपूर्ण कलाविश्वातून अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

Kshiti Jog Birthday Hemant Dhome Shared Romantic Photo And Wished A Happy Birthday To Wife | "पाटलीणबाई आज तुमचा जन्म झाला नसता तर...", हेमंत ढोमेच्या क्षिती जोगला हटके शुभेच्छा!

"पाटलीणबाई आज तुमचा जन्म झाला नसता तर...", हेमंत ढोमेच्या क्षिती जोगला हटके शुभेच्छा!

Kshitee Jog Birthday : क्षिती जोग (Kshitee Jog) ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या सहसुंदर अभिनयाने तिनं फक्त मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा एक मोठा चाहतावर्ग आहे.  क्षिती कायम चर्चेत येत असते. आज क्षितीचा वाढदिवस आहे.  या खास दिवशी तिला पती हेमंत ढोमेने (Hemant Dhome) रोमँटिक फोटोसह वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

हेमंत ढोमेने लाडक्या बायकोसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. त्यानं शेअर केलेल्या या फोटोत त्यांची केमिस्ट्री दिसून येत आहे. हेमंत ढोमेने  कॅप्शनमध्ये त्यानं लिहलं, "पाटलीणबाई आज तुमचा जन्म झाला नसता तर काही मजाच आली नसती! बाकी आपलं सेलिब्रेशन तर थांबतच नसतं! Happywala Birthday my love!". या पोस्टवर संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.


हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांची पहिली भेट नाटकाच्या सेटवर झाली होती. यानंतर 2012 मध्ये त्यांनी लग्न केलं. क्षिती ही मराठी सिनेसृष्टीतले दिग्गज कलाकार अनंत जोग (Anant Jog) आणि उज्वला जोग (Ujwala Jog) यांची लेक आहे. क्षिती 18 वर्षांची असताना तिचे आईवडिल वेगळे झाले होते. 

क्षिती जोगच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती अलिकडेच 'मिस मॅच्ड 3' मध्ये पाहायला मिळाली होती. आता लवकर हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' या सिनेमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  हा चित्रपट येत्या २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, क्षिती करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमातही झळकली होती. 

Web Title: Kshiti Jog Birthday Hemant Dhome Shared Romantic Photo And Wished A Happy Birthday To Wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.