क्रांती रेडकर नव्हे तर... अभिनेत्रीने केला खऱ्या आडनावाचा खुलासा, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:37 IST2025-06-16T14:34:41+5:302025-06-16T14:37:40+5:30
क्रांती रेडकरनं एका मुलाखतीदरम्यान तिच्या आडनावामागचा किस्सा सांगितला आहे.

क्रांती रेडकर नव्हे तर... अभिनेत्रीने केला खऱ्या आडनावाचा खुलासा, म्हणाली...
Kranti Redkar Real Surname : इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांचं खरं नाव बदलून दुसरं नाव ठेवलं. अशीच एक मराठी अभिनेत्री आहे. जिचं खरं आडनाव हे वेगळचं आहे. ती अभिननेत्री आहे क्रांती रेडकर. 'कोंबडी पळाली' या गाण्याचं नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर क्रांती रेडकरचं नाव येतं. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री व दिग्दर्शिका म्हणून तिला ओळखलं जातं. पण, क्रांतीचं 'रेडकर' हे मूळ आडनाव नाही. नुकत्याच एका मुलाखतीत क्रांतीनं तिचं खरं आडनाव काय आहे, आणि 'रेडकर' हे आडनाव कसं पडलं, याबद्दल सांगितलं.
प्लॅनेट मराठी ओटीटी या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये क्रांतीनं तिच्या आडनावामागची गोष्ट सांगितली. क्रांतीने खरं आडनाव रेडकर नसून राणे असल्याचा खुलासा केला. मूळ गाव कुठलं? या प्रश्नावर उत्तर देताना क्रांती म्हणाली, "माझे आजोबा हे मालवणचे आहेत आणि आमचं कुलदैवत जे आहे ते रेड्डीला आहे. त्यामुळे आमचं खरं आडनाव हे राणे असं आहे. एकेकाळी आमचे जे राणे बांधव होते, ते रेड्डी वरून निघाले आणि मालवणला येऊन स्थायिक झाले. साधारण चार पिढ्यान पासून रेडकर हे आडनाव आम्ही लावतो". म्हणजेच क्रांतीचे आधी आडनाव राणे हे होतं, मग मालवणला स्थायिक झाल्यानंतर ते बदलून रेडकर असं झाले.
'
क्रांती रेडकरचं लग्नानंतरचं आडनाव हे वानखेडे असं आहे. तिनं २०१७ साली समीर वानखेडेशी लग्न केलं होतं. लक्झरी क्रूझ शिपवर ड्रग्ज पार्टी उधळून लावून शाहरूख खानचा मुलगा आर्यनला अटक केल्यानंतर क्रांतीचे पती प्रचंड चर्चेत आले होते. क्रांतीचाही कपड्यांचा व्यवसाय आहे. 'झिया झायदा' (ZiyaZyda) असं क्रांतीच्या ब्रॅण्डचं नाव आहे. यासोबतचं तिचा ज्वेलरी ब्रॅण्डसुद्धा आहे. क्रांती रेडकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपल्या प्रोफेशनल आयुष्याव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. विविध रील्स शेअर करून जुळ्या मुलींचे किस्से सांगत अभिनेत्री आपल्या सर्व चाहत्यांचं मनोरंजन करत असते.