क्रांती रेडकर आणि उर्मिला कोठारे यांनी अनोख्या पध्दतीने ख्रिसमस साजरा केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 13:01 IST2016-12-24T13:00:42+5:302016-12-24T13:01:31+5:30

सध्या ख्रिसमसची धूम सगळीकडे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या उत्सावादिवशी प्रत्येकजण आपल्या परीने आनंद लुटत असतात. कोणी बाहेरगावी जाऊन ...

Kranti Redkar and Urmila Kothare celebrated Christmas in a unique way | क्रांती रेडकर आणि उर्मिला कोठारे यांनी अनोख्या पध्दतीने ख्रिसमस साजरा केला

क्रांती रेडकर आणि उर्मिला कोठारे यांनी अनोख्या पध्दतीने ख्रिसमस साजरा केला

्या ख्रिसमसची धूम सगळीकडे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या उत्सावादिवशी प्रत्येकजण आपल्या परीने आनंद लुटत असतात. कोणी बाहेरगावी जाऊन तर कोणी आपल्या परिवारासोबत हा उत्सव साजरा करत असतात. मात्र आपल्या प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री क्रांती रेडकर आणि उर्मिला कोठारे यांनी एक अनोख्या पध्दतीने ख्रिसमस साजरा केला आहे. त्यांनी नुकतेच ठाणे येथील एका सामाजिक संस्थेला भेट दिली. या सामाजिक संस्थेचे नाव जागृत पालक असे आहे. या संस्थेतील विशेष मुलांसोबत त्यांनी ख्रिसमस हा सण साजरा केला आहे. या निरागस आणि अल्लड असणाºया मुलांसोबत या सणाचा मनसोक्त आनंद लुटला आहे. तसेच या दोघींनीही या मुलांच्या पालकांसोबत भरघोस संवाद साधला आहे. पालकत्वाची जबाबदारी खूप मोठी असते. ही जबाबदारी योग्यरीत्या स्वीकारता आली पाहिजे. असा संदेश या सुंदर अभिनेत्रींनी यावेळी दिला आहे. क्रांती रेडकर आणि उर्मिला कोठार या दोन अभिनेत्रींचा लवकरच करार हा आगामी चित्रपट येत आहे. समाजात विशिष्ट नाव आणि ओळख बनवण्यासाठी स्वत:च्या पत्नीच्या भावनांचा अनादर करणाºया  एका करारबद्ध तरुणांची कथा करार या चित्रपटात मांडली आहे. त्याचप्रमाणे आयुष्याला केवळ करार म्हणून पाहणाºया या तरुणाच्या वैवाहिक आयुष्यातल्या उणीवा, आणि त्यातून भविष्यात उद्भवणा-या समस्या या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. तसेच मातृत्व मिळवण्यासाठी एका स्त्रीची होत असलेली तडफड आणि त्यासाठी केला जाणारा व्यवहार या चित्रपटाचा महत्वाचा सार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना या दोन अभिनेत्री मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.  करार  या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर आणि म्युझिक लॉच करण्यात आले आहे.  मनोज कोटियन दिग्दर्शित करार या सिनेमाचे क्रेक इंटरटेंटमेन्टच्या पूनम सिव्हिया आणि नीलम सिव्हिया यांनी निर्मिती केली आहे. तसेच परेश दवे या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहे. हा चित्रपट १३ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Kranti Redkar and Urmila Kothare celebrated Christmas in a unique way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.