श्रीराम लागुंनी वाचली कणा कविता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 15:01 IST2016-12-23T15:01:53+5:302016-12-23T15:01:53+5:30
आपल्या हातातल्या तेवढ्याच तन्मयतेने आपल्या लमाण या आत्मचरित्राला स्पर्श करतात. तेव्हा समोर असलेल्या रसिकांच्या मनात अनेक विचारांचा कल्लोळ माजलेला ...

श्रीराम लागुंनी वाचली कणा कविता
आ ल्या हातातल्या तेवढ्याच तन्मयतेने आपल्या लमाण या आत्मचरित्राला स्पर्श करतात. तेव्हा समोर असलेल्या रसिकांच्या मनात अनेक विचारांचा कल्लोळ माजलेला होता. हा रसिकांच्या अंतर्मनातील कल्लोळ शांत झाला तो 'मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा' ही कविवर्य कुसुमाग्रजांची कणा ही कविता साक्षात नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांनी त्यांच्या भारदस्त सादर केली.
कसलेल्या दिग्गज कलाकारांनी सादर केलेल्या कविता आणि ललितबंधाचे अभिवाचन आणि त्याच तळमळीने, तृप्त मनाने साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी केलेले रसिकजन अशा भारावलेल्या वातावरणात कोथरूड येथील डहाणूकर कॉलनी परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या राजहंस - अक्षरधारा बुक गॅलरीचा उद्घाटन सोहळा पार पडला.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्य हस्ते राजहंस- अक्षरधारा बुक गॅलरीच्या उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डॉ. श्रीराम लागू, सोनाली कुलकर्णी, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, ज्येष्ठ लेखक द.मा. मिरासदार, राजहंस प्रकाशनाचे प्रमुख दिलीप माजगावकर, प्रसिद्ध लेखक प्रा. डॉ.मिलींद जोशी, राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ.सदानंद बोरसे, आमदार मेधा कुलकर्णी, श्याम देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी सादर ' केलेल्या मंगेश पाडगावकरांच्या 'उदासबोध' आणि 'गुंडधर्म' या कवितेला रसिकांनी दिलखुलास दाद दिली. तर इंदिरा संतांच्या हळुवार शब्दांचा साज असलेल्या 'मृदगंध'मधील 'गंधगाभारा'चे प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केलेले अभिवाचन रसिकांच्या मनात घर करून गेले.
विनया देसाई यांनी सूत्रसंचलन केले, अक्षरधाराच्या रसिका राठीवडेकर यांनी प्रास्तविक केले, तर रमेश राठीवडेकर यांनी आभार मानले.