किशोरी शहाणेंनी सांगितला 'चला जेजुरीला जाऊ' गाण्यामागील कधीही न ऐकलेला किस्सा, म्हणाल्या- "सचिनचा फोन आल्यावर..."

By देवेंद्र जाधव | Updated: June 10, 2025 13:17 IST2025-06-10T13:16:22+5:302025-06-10T13:17:27+5:30

'नवरा माझा नवसाचा' सिनेमातील 'चला जेजुरीला जेऊ' ही लावणी करतानाचा खास किस्सा किशोरी शहाणेंनी सांगितला आहे. तो वाचून तुम्हीही आनंदी व्हाल

Kishori Shahane told story behind the Chala Jejurila Jau song from navara maza navsacha movie | किशोरी शहाणेंनी सांगितला 'चला जेजुरीला जाऊ' गाण्यामागील कधीही न ऐकलेला किस्सा, म्हणाल्या- "सचिनचा फोन आल्यावर..."

किशोरी शहाणेंनी सांगितला 'चला जेजुरीला जाऊ' गाण्यामागील कधीही न ऐकलेला किस्सा, म्हणाल्या- "सचिनचा फोन आल्यावर..."

२००४ साली आलेला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमात अभिनेत्री किशोरी शहाणेंनी एक खास लावणी सादर केली होती. या सिनेमातील ही लावणी प्रेक्षकांना चांगलीच आवडली. आजही या लावणीवर अनेकजण नृत्य करताना दिसतात. सिनेमात ही लावणी सादर करण्याआधी काय घडलं होतं? याचा खास किस्सा किशोरी शहाणेंनी सांगितला. त्यावेळी किशोरी शहाणेंनी सिनेमातून ब्रेक घेतला होता. तरीही त्या लावणी करायला कशा तयार झाल्या? जाणून घ्या

लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत किशोरी शहाणेंनी सांगितलं की, "याचा किस्सा असा आहे की, नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील ही लावणी चला जेजुरीला जाऊ. मला सचिनचा फोन आला आणि ते मला म्हणाले की, मोठा रोल नाहीये एक छोटासा रोल आहे. तुझी आणि अशोकची एक मिनी लव्हस्टोरी आम्ही दाखवणार आहोत. तुमच्या पिक्चरसाठी काहीही, असं मी त्यांना म्हटलं." 

"मी तेव्हा जवळपास १० वर्ष पिक्चरमध्ये काम करत नव्हते. लग्न झाल्यावर माझं प्राधान्य संसाराला होतं. बॉबी त्यावेळी मोठा होत होता. मी मालिकेत काम करत होते कारण मला मुंबईबाहेर जायचं नव्हतं. मुलगा १० वी होईपर्यंत मला मुंबईतच राहायचंय, बाहेर जायचं नाही, असा माझा विचार होता. तेव्हा सचिनजी म्हणाले की, शूटिंग मुंबईत आहे आणि मी लगेच मी होकार दिला." 

"ही लावणी झाली तेव्हा वाटलं नव्हतं की, एवढी गाजेल. ही लावणी का गाजली माहितीये? कारण ती धार्मिक नव्हती. लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत या गाण्यावर कोणीही नृत्य केलं तरी काही वावगं वाटत नाही. लहान लहान मुली डान्स करतात, कॉलेजमध्येही मी जाते माझ्यासमोर स्पेशली या लावणीवर डान्स करतात." अशाप्रकारे किशोरी शहाणेंनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. किशोरी शहाणे सध्या हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात व्यस्त आहेत. 

Web Title: Kishori Shahane told story behind the Chala Jejurila Jau song from navara maza navsacha movie