'टीनएजर' झाला ह्यो वाघाचा बछडा...' किरण मानेंची लाडक्या लेकाच्या वाढदिवशी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 15:11 IST2023-11-19T15:09:10+5:302023-11-19T15:11:34+5:30

 मुलगा आरूषच्या वाढदिवसाला किरण माने यांनी खास पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Kiran Mane's special post on her beloved son birthday | 'टीनएजर' झाला ह्यो वाघाचा बछडा...' किरण मानेंची लाडक्या लेकाच्या वाढदिवशी खास पोस्ट

'टीनएजर' झाला ह्यो वाघाचा बछडा...' किरण मानेंची लाडक्या लेकाच्या वाढदिवशी खास पोस्ट

किरण माने हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मानेंच्या सोशल मीडिया पोस्ट हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. सध्या मानेंच्या अशाच एका पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.  मुलगा आरूषच्या वाढदिवसाला किरण माने यांनी खास पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

किरण मानेंनी पोस्टमध्ये म्हटलं की, "...जो मज़ा अपने बेटे को जवान होते देखकर आता है... वो अपनी जवानी में भी नहीं आता !" काय डायलाॅग ल्हीलाय भावांनो गुलज़ारसायेबांनी... लैच जबराट.लेकराचा आज वाढदिवस. आज खर्‍या अर्थानं 'टीनएजर' झाला ह्यो वाघाचा बछडा. तेरा पूर्ण करून चौदाव्या वर्षात पाऊल ठेवलं'.

पुढे ते म्हणाले, 'रात्री बारा वाजता छोटं सेलीब्रेशन केलं. हातात गिटार घेऊन मला म्हन्ला, "बाबा तुमी माझ्या वयाचे होता, त्यावेळी तुमचं जे आवडतं गाणं होतं, ते म्हणा. " एका मिन्टात त्या वयात गेलो. अंगात लगीच बच्चन संचारला. भान हरपून गायला लागलो... "इन्तेहाS हो गयी... इंतज़ार की... आई ना कुछ खबर... मेरे यार की.."...आणि त्यावर आरूषनं गिटारची साथ दिली!'.

'लै नादखुळा माहौल झाला घरात. ईशानं आमची ती मैफल कॅमेर्‍यात कैद केली.लब्यू आरूष. लै आनंदी रहा. जे करायचं ठरवशील ते मनापास्नं-जीव लावून कर. निरोगी, सुदृढ आणि समृद्ध आयुष्य जग. हॅप्पी बड्डे!', या शब्दात किरण माने यांनी मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 


किरण माने हे नाटक, मालिका आणि सिनेमा अशा विविध माध्यमातून त्यांनी कायम प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. माने यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ते कलर्स वाहिनीवरील 'सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची' या मालिकेत झळकले होते. या मालिकेत त्यांनी सिधुंताई सकपाळ यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेला विशेष प्रेम मिळालं. त्यानंतर आता ते पुन्हा एका नव्या प्रोजेक्ट माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Web Title: Kiran Mane's special post on her beloved son birthday