केतकी पालव अडकली विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 16:54 IST2016-12-29T16:54:33+5:302016-12-29T16:54:33+5:30

सध्या २०१६ हे वर्षे मराठी इंडस्ट्रीसाठी खूप छान ठरले असल्याचे पाहायला मिळत आहे. एक से एक चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्ट्रीत ...

Ketaki Pav is stuck in a marriage | केतकी पालव अडकली विवाहबंधनात

केतकी पालव अडकली विवाहबंधनात

्या २०१६ हे वर्षे मराठी इंडस्ट्रीसाठी खूप छान ठरले असल्याचे पाहायला मिळत आहे. एक से एक चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्ट्रीत एका पाठोपाठ एकजण विवाहबंधनात अडकताना दिसत आहे. आता हेच पाहा ना, मृण्मयी देशपांडे, चिराग पाटील, श्रुती मराठे यांच्यापाठोपाठ वर्षे अखेरीस आणखी एक मराठी चित्रपटसृष्ट्रीची जोडी विवाहबंधनात अडकली आहे. श्रवणबाळ रॉकस्टार या मालिकेतील अभिनेत्री केतकी पालवदेखील विवाहबंधनात अडकली आहे. केतकीने  गंधार पटवर्धनची जीवनसाथी म्हणून निवड केली आहे. या अभिनेत्रीच्या आनंदाची क्षणी बºयाच कलाकारांनी हजेरी लावली आहे. यामध्ये प्रमिती नरके, पूजा ठोंबरे, हर्षदा खानविलकर, मयूरी देशमुख असे अनेक कलाकार उपस्थित होते. केतकीच्या लग्नाविषयी प्रमिती लोकमत सीएनएक्स सांगते, सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लग्नाचे सीझन सुरू आहे. आता या लिस्टमध्ये केतकीच्या नावाचादेखील समावेश झाला आहे. मात्र केतकीचे लग्न खूपच वेगळे होते. अत्यंत साधेपणाने तिचे लग्न पार पडले. खूपच छान वाटले. अगदी जवळची माणसेच तिच्या लग्नाला हजर होते. मराठी इंडस्ट्रीच्या हा वेडिंगच्या सीझन खरचं खूपच भारी होता.  केतकी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ती सध्या श्रवणबाळ रॉकस्टार या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकत आहे. तसेच तिने फितरून नावाचा मराठी चित्रपटदेखील केला आहे. त्याचप्रमाणे तिने रंगभूमीवरदेखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. जल्लोष सुवर्णयुगाचा या डान्स रियालिटी शोमध्येदेखील ती नृत्य करताना पाहायला मिळाली. अशा पध्दतीने केतकीने डान्स, नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. 

Web Title: Ketaki Pav is stuck in a marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.