या लहान मुलीला ओळखलं का? गायनासोबतच अभिनयातही तितकीच पारंगत आहे महाराष्ट्राची लाडकी कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:00 IST2025-10-10T17:00:12+5:302025-10-10T17:00:42+5:30
फोटोत दिसणारी ही चिमुकली आज गायनासोबतच अभिनयातही तितकीच पारंगत आहे.

या लहान मुलीला ओळखलं का? गायनासोबतच अभिनयातही तितकीच पारंगत आहे महाराष्ट्राची लाडकी कलाकार
मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरू असते. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल चाहते बोलत असतात. या कलाकारांचे हटके फोटोही याचाच एक भाग. अनेकदा कलाकारांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. फोटोत दिसणारी ही चिमुकली आज गायनासोबतच अभिनयातही तितकीच पारंगत आहे.
महाराष्ट्राची लाडकी कलाकार असूनही अनेकांना तिला ओळखणं कठीण जातंय. तर ही आहे केतकी माटेगावकर. लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर तिच्या गोड आवाजासाठी आणि निरागस अभिनयासाठी ओळखली जाते. अभिनयात सक्रिय असण्यासोबतच केतकी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि ती नेहमीच चाहत्यांशी संवाद साधत असते. नुकताच केतकीने तिच्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. लहानपणीचा एक अत्यंत सुंदर आणि गोड फोटो तिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला.
लहानपणीचा केतकीचा गोडवा आजही तितकाच कायम आहे. केतकीने शेअर केलेल्या लहानपणीचा हा फोटो चाहत्यांना आडलाय. तिचा हा फोटो क्षणार्धात सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. 'किती गोड!', 'नेहमीच सुंदर' आणि 'खूपच क्युट' अशा कमेंट्स करत चाहत्यांनी तिच्या या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. २०१४ साली रिलीज झालेल्या टाईमपास सिनेमातील दगडू आणि प्राजूने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. केतकी माटेगावकर हिने 'तानी', 'शाळा', 'काकस्पर्श', 'टाइमपास', 'फुंतरू' यांसारख्या चित्रपटात काम केले असून यातील तिच्या अभिनयाचं कौतुक देखील झाले आहे.