केतकी माटेगावकर पडली मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2017 15:21 IST2017-01-29T09:51:49+5:302017-01-29T15:21:49+5:30
आपल्या आवाजाने आणि अभिनयाने अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. तसेच मला वेड लागले प्रेमाचे या गाण्याने ...

केतकी माटेगावकर पडली मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रेमात
आ ल्या आवाजाने आणि अभिनयाने अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. तसेच मला वेड लागले प्रेमाचे या गाण्याने तर चक्क तिने प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पडण्यासाठी मजबूर केले आहे. म्हणून केतकीदेखील प्रेक्षक आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रेमात पडली असल्याचे दिसत आहे. कारण तिने नुकतेच एका संकेतस्थळावर ब्लॉग लिहीला आहे.
तिने या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या जीवनप्रवास मांडला आहे. तसेच मराठी चित्रपटसृष्टीचे कौतुकदेखील केतकीने केले आहे. ती आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून सांगते, सुरुवातीपासूनच माझी गायिका + अभिनेत्री ही प्रतिमा जपत मी पुढे जायचा प्रयत्न करते आहे. मराठी इंडस्ट्रीने मला खूप मित्र मैत्रिणी दिले आहेत. इथे वावरताना खूप शिकायला मिळालं. खूप दिग्गज कलाकारांकडून दाद आणि कानपिचक्याही मिळाल्या आहेत. आज हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो की साहित्यातल्या अजरामर कलाकृती आपल्या इंडस्ट्रीने पडद्यावर आणल्या. अनेक चित्रपटांतून प्रखर जनजागृतीही केली आहे. संवेदनशील अशा विषयांना हात घालत लोकांच्या सामाजिक जाणीवही जिवंत केल्या आहेत.
अत्यंत आशयघन असे चित्रपट आणि उत्तम दर्जा असलेले मनोरंजनात्मक विनोदी चित्रपटही आपण दिले आहेत, देतो आहोत. दादा साहेब फाळकेंसारख्या एका मराठी माणसाने निर्माण केलेल्या या इंडस्ट्रीचा मी एक लहानसा हिस्सा आहे याचा मला सार्थ अभिमान आणि आनंद वाटतो. आज हिंदी चित्रपटसृष्टीतही आशय असलेल्या कथांसाठी आपल्या मराठी इंडस्ट्रीकडे आशेने पाहिलं जातं ही केवढी सन्मानाची गोष्ट आहे! अशा लाखो लोकांना, कलाकारांना, तंत्रज्ञाना सामावून घेणाºया आणि रोजीरोटी देणाºया मराठी चित्रपट सृष्टीला माझा मानाचा मुजरा.!!!