n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">काकस्पर्श हा महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाची निर्मिती हिंदी आणि दाक्षिणात्या भाषेत केली जात आहे. यामध्ये अरविंद स्वामी प्रमुख भूमिका साकारणार असून आदिनाथ कोठारे, केतकी माटेगावकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण कित्येक महिन्यापूर्वीच झाले आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित व्हायला आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. दाक्षिणात्य भाषेत हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असला तरी हिंदीसाठी वेळ लागणार असल्याचे म्हटले जात आहे. हिंदीमध्ये या चित्रपटाला वितरकच मिळत नसल्याची चर्चा आहे.