कनिका चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 15:17 IST2017-02-27T09:47:31+5:302017-02-27T15:17:31+5:30

मराठी चित्रपटसृष्टीत कणिका हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Kanika film teaser displayed | कनिका चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

कनिका चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

 
राठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळया आशयाचे चित्रपट पाहायला मिळत आहे. मात्र हॉरर चित्रपटांची उणीव नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीत जाणविते. आता हीच उणीव भरण्यासाठी लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत कणिका हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. सेव्हन वंडर्स मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून  पुष्कर मनोहर दिग्दर्शनात पदापर्ण करणार आहे. 
         
       स्वत: व्यावसायिक असलेल्या पुष्कर यांना चित्रपट माध्यमाविषयी विशेष प्रेम होते. त्या प्रेमातूनच त्यांनी कनिका हा चित्रपट साकारला आहे. आताच्या काळाशी सुसंगत असलेली कथा या चित्रपटातून त्यांनी मांडली आहे. ही हॉरर सूडकथा आहे. आतापर्यंतच्या मराठी चित्रपटात हा नक्कीच वेगळा प्रकार ठरणार आहे. या चित्रपटात अभिनेते शरद पोंक्षे, अभिनेत्री स्मिता शेवाळे, चैत्राली गुप्ते, कमलाकर सातपुते, आनंदा कारेकर, फाल्गुनी रजनी अशी उत्तम स्टारकास्ट आहे. पुष्कर यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे, या चित्रपटात एकही गाणं नाही. सेव्हन वंडर्स मोशन पिक्चर्सच्या संदीप मनोहर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमेय नारे यांच संगीत, कॅमेरामन चंद्रशेखर नगरकर तर कुलदीप मेहन यांनी संकलन केलं आहे. हा चित्रपट ३१ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आणखी काही दिवस या चित्रपटाची वाट पहावी लागणार आहे. 
       
       या चित्रपटाविषयी दिग्दर्शक पुष्कर मनोहर सांगतात, 'मराठीत सामाजिक किंवा विनोदी प्रकारचेच चित्रपट होतात असं एक चित्र आहे. मात्र, त्या पलिकडे जाऊन आपल्या आजुबाजूला अनेक घटना घडत असतात. त्या खूप संवेदनशील असतात. त्याचं प्रतिबिंब उमटताना दिसत नाही. मराठीमध्ये हॉरर सूडकथा ही वेगळा प्रकार हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. 


Web Title: Kanika film teaser displayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.