कलाम यांच्या जीवनावर बनणार बायोपिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2016 15:23 IST2016-05-16T09:53:44+5:302016-05-16T15:23:44+5:30

         बॉलीवुडमध्ये अनेक विषयांवर, मोठ-मोठ्या लोकांच्या जीवनावरील बायोपिक येऊन गेले आहेत. बायोपिक पाहणे प्रेक्षकांना देखील आवडते ...

Kalam's life will be biopic | कलाम यांच्या जीवनावर बनणार बायोपिक

कलाम यांच्या जीवनावर बनणार बायोपिक


/>         बॉलीवुडमध्ये अनेक विषयांवर, मोठ-मोठ्या लोकांच्या जीवनावरील बायोपिक येऊन गेले आहेत. बायोपिक पाहणे प्रेक्षकांना देखील आवडते आणि त्यामुळेच मेरी कॉम, भाग मिल्खा भाग यासारख्या चित्रपटांची प्रशंसा केली गेली तर आता  डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा देखील जीवनप्रवास, लवकरच उलगडणार आहे मोठ्या पडद्यावर. निर्माते प्रमोद गोरे यांना अब्दुल कलाम यांच्या जीवनावर चित्रपट तयार करायचा आहे. आणि या चित्रपटामध्ये बॉलीवुडचा दर्जेदार अभिनेता इरफान खान याला घेण्याचा त्यांचा मनसुबा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रमोद गोरे रामेश्वरम येथील कलाम यांच्या घरी सुद्धा गेले होते. त्यावेळी ते कलाम यांच्या मोठ्या भावाला भेटले. कलाम यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर उलगडण्यासाठी त्यांच्या कुटूंबियांची परवानगी घेणे गरजेचे होते असे ते म्हणाले. या चित्रपटाविषयी बोलताना गोरे म्हणाले, मी अथर्व मोशन पिचर्स या माझ्या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. अब्दुल कलाम यांनी आपल्या देशासाठी एवढे काही काम केले आहे कि मी नक्की कोणत्या विषयावर प्रकाश टाकु हा प्रश्न आहे. एवढे मात्र खरे की आपल्याला लवकरच एक चांगला चित्रपट अन कलाम यांच्या जीवनातील काही घडामोडी लवकरच बिग स्किनवर पहायला मिळणार आहे. 

Web Title: Kalam's life will be biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.