लॉकडाऊनमध्ये ही लोकप्रिय अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, ,समोर आले लग्नाचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 17:07 IST2020-07-15T17:05:15+5:302020-07-15T17:07:20+5:30
अर्चना निपाणकरने 11 वर्षांपासून ओळखत असलेल्या तिच्या मित्रासोबत लग्न करत आपल्य़ा आयुष्य़ाची नवीन सुरूवात केली आहे. पार्थ रामनाथपूरसह ती विवाहबद्ध झाली आहे.

लॉकडाऊनमध्ये ही लोकप्रिय अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, ,समोर आले लग्नाचे फोटो
लॉकडाऊन सुरू होण्याआधीच अभिनेत्री अर्चना निपाणकरने साखरपुडा केल्याची बातमी चाहत्यांसह शेअर केली होती. आता अर्चना लग्नाच्याही बेडीत अडकली आहे. खुद्द फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत तिने आपला आनंद चाहत्यांसह शेअर केला आहे. फोटो शेअर करताच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अर्चनाने 11 वर्षांपासून ओळखत असलेल्या तिच्या मित्रासोबत लग्न करत आपल्य़ा आयुष्य़ाची नवीन सुरूवात केली आहे. पार्थ रामनाथपूरसह ती विवाहबद्ध झाली आहे. लॉकडाऊनमुळे मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडले असले तरी तिच्या सर्व कलाकार मित्रांनी या नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. लग्नात अर्चनाने कांजीवरम साडी परिधान केली होती.त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. तर पार्थसुद्धा दाक्षिणात्य पोशाखात पाहायला मिळत आहे. “दोघं रेशीमगाठीत अडकल्याचे पाहून अत्यंत आनंद झाला. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात अडकले आणि आता जे आपल्या जीवनाचा नवा अध्याय सुरू करतात हे पाहून खूप छान वाटत आहे” अशी प्रतिक्रिया तिच्या फोटोंवर उमटत आहेत.
'का रे दुरावा' ही मालिका संपून अनेक वर्षं झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. या मालिकेत आपल्याला अर्चना निपाणकर एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. अर्चनाने अनेक मालिकांमध्ये काम करण्यासोबतच ती नुकतीच पानिपत या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने राघोबादादा पेशवे यांच्या पत्नीची म्हणजेच आनंदीबाईची भूमिका साकारली होती.