​जानकी लघुपटाचा प्रिमिअर शो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 17:22 IST2016-06-01T11:52:20+5:302016-06-01T17:22:20+5:30

श्री पद्मालया म्युझिक व चित्र निर्मित ‘जानकी’ या लघुपटाचा प्रिमिअर शो बुधवार १ जून रोजी रात्री ८ ते ९.३० ...

Junkie Shortcut Premier Show | ​जानकी लघुपटाचा प्रिमिअर शो

​जानकी लघुपटाचा प्रिमिअर शो

री पद्मालया म्युझिक व चित्र निर्मित ‘जानकी’ या लघुपटाचा प्रिमिअर शो बुधवार १ जून रोजी रात्री ८ ते ९.३० या वेळेत कांताई हॉल येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती निर्माता अरविंद जोशी यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी दिग्दर्शक प्रशांत सोनवणे, प्रॉडक्शन मॅनेजर सुरेश राजपूत उपस्थित होते. या लघुपटात अभिनेत्री प्रिया बेर्डे व पूजा नायक यांची प्रमुख भूमिका आहे. लघुपटाचा उद्घाटन सोहळा जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते होणार आहे. या लघुपटात जळगावातील विजय पवार, शरद पांडे, किरण अडकमोल, जगदीश नेवे, शुभदा नेवे, ललिता अमृतकर, प्रेम रायसोनी, आरती गोळीवाले, संगीता बोलके, सविता पाटील, प्रभाकर सोनवणे, पवन इंद्रेकर, सपना बाविस्कर यांच्यासह स्थानिक कलाकारांचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.

शुभारंभ कार्यक्रमास आमदार सुरेश भोळे, नवजीवन सुपर शॉपचे अनिल कांकरिया, पं.स.सदस्य प्रभाकर सोनवणे, के.के.कॅन्सचे रजनीकांत कोठारी, पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, सातपुडा आॅटोमोबाईल्सचे किरण बच्छाव, कोगटा ग्रुपचे प्रेम कोगटा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Web Title: Junkie Shortcut Premier Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.