द जर्नी कॉन्टीनुए उस्ताद अल्लारखाँ यांना त्यांच्या 99व्या जयंतीनिमित्त मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 16:57 IST2018-04-24T11:27:57+5:302018-04-24T16:57:57+5:30

संगीताचा मुनमुराद आनंद लुटण्याचा वर्षातील तो दिवस अखेर आला आहे. उस्ताद अलारखाँ यांचा वारसा पुढे सुरू ठेवणारे, त्यांचे पुत्र ...

The Journey Continuiste Ustad Allarakhan is honored for his 99th birthday | द जर्नी कॉन्टीनुए उस्ताद अल्लारखाँ यांना त्यांच्या 99व्या जयंतीनिमित्त मानवंदना

द जर्नी कॉन्टीनुए उस्ताद अल्लारखाँ यांना त्यांच्या 99व्या जयंतीनिमित्त मानवंदना

गीताचा मुनमुराद आनंद लुटण्याचा वर्षातील तो दिवस अखेर आला आहे. उस्ताद अलारखाँ यांचा वारसा पुढे सुरू ठेवणारे, त्यांचे पुत्र फझल कुरेशी यांनी आपल्या पित्याच्या स्मरणार्थ, दरवर्षीप्रमाणे यंदाही विशेष मैफलीचे आयोजन केले आहे, यावेळी ते स्वतः कार्यक्रम सादर करतील. या कॉन्सर्टचे हे नवव्या वर्षातील पदार्पण असून याद्वारे संगीतक्षेत्रातील तरुण आणि प्रस्थापित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.

तबला उस्ताद अल्लारखाँ, यांनी संगीत विश्वात तबला हे वाद्य आघाडीवर आणले. या महान कलाकाराचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे, 29 एप्रिल 2018 रोजी या विशेष वर्षाला सुरुवात होईल. महान ड्रमर मिकी हार्ट यांच्या मते, ``अल्लारखाँ म्हणजे आईनस्टाईन आहेत, पिकासो आहेत, या पृथ्वीतलावरील लयीच्या विकासात ते सर्वोत्तम आहेत.’’

उस्ताद अल्लारखाँ यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पुत्र आणि तबलावादक उस्ताद फझल कुरेशी आणि अभिनेते-कथाकार दानिश हुसैन यांनी एकत्र येऊन, महान तबलावादक अल्लारखाँ यांना खास सांगीतिक मानवंदना देऊ केली आहे. यासाठी त्यांच्या काही रचनांची पुनर्निर्मिती केली जाणार आहे आणि याच आनंदोत्सवातून संलग्नितपणे त्यांचा जीवनप्रवास उलगडला जाणार आहे. त्यांनी जो प्रवास सुरू केला आणि ज्या वाटेवर ते चालत राहिले त्याची यात झलक पाहता येईल.

या कॉन्सर्टला कशा प्रकारे सुरुवात झाली आणि ती प्रत्यक्षात कशी साकारली याविषयी फझल कुरेशी सांगत होते, ते म्हणाले की, ``एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परंपरा सुपूर्द करण्यासारखेच आहे हे.कॉन्सर्टच्या या व्यासपिठावरून तरुण प्रतिभावंतांना त्यांची कौशल्ये प्रदर्शित करण्याची संधी मिळते आणि याद्वारे परंपराही जिवंत रहाते. येत्या पिढीकडे अब्बाजींचे तत्वज्ञान दिले जाईल, याची खात्री ही तरुण पिढी घेते.’’

कार्यक्रमाच्या संध्याकाळी उस्ताद फझल कुरेशी (तबला) इतर कलाकारांबरोबर सादरीकरण करतील:

·        दानिश हुसैन – अभिनेते/ कथाकार

·        झुबिन बालापोरिया – कीबोर्ड

·        दिलशाद खान – सारंगी

·        श्रीधर पार्थसारथी – मृदुंग

·        शेल्डन डिसिल्वा – बास

·        अभिषेक मल्लिक – सितार

·        प्रशांत समाधार – व्होकल

·        कुश्मिता – व्हायोलिन

·        अँड्रूयू कांगा – ड्रम्स

·        फैझन हुसैन – परक्युजन

या कार्यक्रमासाठी सर्व ठिकाणांहून अनेक लोकांना एकत्र करण्यात आले आहे. अब्बाजींचे तत्वज्ञान पुन्हा एकदा गोळा करताना, फझल कुरेशी यांनी संगीत लोकांना कशाप्रकारे बांधून ठेवते ते विशद केले. ते म्हणाले, ``आपण संगीताचे विविध प्रकार ऐकतो, लोक विविध प्रकारे संगीत तयार करतात, हे पाहतो. त्यांच्या वेगळेपणाला कोण बांधून ठेवते? तर लय. अब्बाजी नेहमी म्हणायचे, लय एक तलम धाग्यासारखी आहे, सर्व कलाकारांना एकत्र बांधून ठेवते. तिच्या प्रकारात विविधता असते, परंतु लय मात्र समान असते.’’
यंदाच्या कार्यक्रमातून तुम्ही नक्की कोणती अपेक्षा करू शकता, याबाबत ते म्हणाले की, ``हा कार्यक्रम तुम्हाला गुंगवून ठेवणारा आणि उच्चकम ऊर्जा देणारा करमणुकीचा कार्यक्रम असणार आहे.’’

Web Title: The Journey Continuiste Ustad Allarakhan is honored for his 99th birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.