जॉन अब्राहम बनला मराठी चित्रपटाचा निर्माता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2017 15:07 IST2017-04-20T09:37:14+5:302017-04-20T15:07:14+5:30
मराठी चित्रपटाचे वेध आता बॉलिवूड कलाकारांनादेखील लागले आहेत. प्रियांका चोप्रा, अजय देवगण, अक्षय कुमार यांसारख्या कलाकारांनी आतापर्यंत मराठी चित्रपटांची ...

जॉन अब्राहम बनला मराठी चित्रपटाचा निर्माता
म ाठी चित्रपटाचे वेध आता बॉलिवूड कलाकारांनादेखील लागले आहेत. प्रियांका चोप्रा, अजय देवगण, अक्षय कुमार यांसारख्या कलाकारांनी आतापर्यंत मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. प्रियांका चोप्राच्या व्हेंटिलेटर या चित्रपटाला तर यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारातदेखील अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणि आता जॉन अब्राहम मराठी चित्रपटाकडे वळला आहे.
जॉन एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असून या चित्रपटात मराठीतील अनेक चांगले कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. जॉनने चित्रपटाची निर्मिती करण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. त्याने याआधी विकी डोनर या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली होती आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. तसेच मद्रास कॅफे, रॉकी हँडसम, फोर्स टू या चित्रपटाचीदेखील त्याने निर्मिती केली आहे आणि आता तो मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
फुगे या चित्रपटाच्या ट्रेलरच्या लाँचिंगप्रसंगी जॉन अब्राहम आला होता. त्याचवेळी तो फुगे या चित्रपटाच्या प्रेमात पडला होता. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांच्यासोबत निर्माता, अभिनेता म्हणून काम करायला आवडेल असे त्याने तेव्हाच म्हटले होते. त्यामुळे आता तो त्यांच्यासोबत काम करत आहे. जॉन आता मराठी चित्रपटांच्या निर्मितीत उतरला असून त्याच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशीच करणार आहेत.
जॉनच्या चित्रपटाचे नाव सविता दामोदर परांजपे असे असून हा एक सायकोलोजिक थ्रिलर सिनेमा आहे. सविता दामोदर परांजपे या गाजलेल्या नाटकावर हा चित्रपट बनवला जाणार असून यात सुबोध भावे, राकेश बापट आणि तृप्ती तोरडमल यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. यावेळी या चित्रपटातील कलाकारांसोबतच या चित्रपटाच्या दिग्दर्शिका, या चित्रपटाची संपूर्ण टीम आणि जॉन अब्राहम उपस्थित होता.