जितेंद्र जोशीने कवितेच्या माध्यमातून मांडले समाजातील वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 16:40 IST2019-01-02T16:38:53+5:302019-01-02T16:40:14+5:30

अभिनेता जितेंद्र जोशीने नुकतीच समाजातील वास्तव मांडणारी कविता त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे.

Jitendra Joshi, the reality of the community, through poetry | जितेंद्र जोशीने कवितेच्या माध्यमातून मांडले समाजातील वास्तव

जितेंद्र जोशीने कवितेच्या माध्यमातून मांडले समाजातील वास्तव

ठळक मुद्देजितेंद्र जोशीने सोशल मीडियावर कवितेतून व्यक्त केले मत

अभिनेता जितेंद्र जोशीने अभिनयासोबतच संवेदनशील लेखक व कवी म्हणून ओळखला जातो. त्याने नुकतेच समाजातील वास्तव मांडणारी कविता त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे. या कवितेतून त्याने राम मंदिर आणि मशीदचा मुद्दादेखील मांडला आहे. 


जितेंद्रने आपल्या कवितेत म्हटले आहे की, ''पिछले सालभर मे न तो हत्या हुई मेरी, ना ही मुझपर बलात्कार हुआ मैं गाय की तरह जिंदा हूँ यही चमत्कार हुआ, मै सालभर में सच को अंदरही दबाए रखने मे कामयाब रहा, आज फिर एक नया साल आया है, सभी की तरह मैंने भी रिवाज निभाया है, आनेवाले साल मे अपनी आमदनी और बढाऊंगा, काट डालूं या कट जाऊं लेकिंन यही गाऊंगा, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब.''
नववर्षाच्या मुहूर्तावर जितेंद्रने ट्विटरवर त्याची कविता पोस्ट केली आहे. या कवितेतून जितेंद्रने समाजातील सद्याची स्थिती मांडली आहे. त्याच्या या पोस्टला संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे.


जितेंद्र जोशी नेहमीच सोशल मीडियावर आपले मत प्रखरपणे मांडत असतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला त्याला वादाला सामोरे जावे लागते. 

Web Title: Jitendra Joshi, the reality of the community, through poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.