'डिस्को सन्या'च्या रिलीजआधीच टॉलिवूडमध्ये 'जय चिंगाबुंगा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 12:54 IST2016-07-29T07:24:42+5:302016-07-29T12:54:42+5:30

साधारणत: मराठी चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांना तो किती आवडतो, बॉक्स आॅफीसवर तो किती कमाई करतो, हे पाहूनच त्या चित्रपटाच्या ...

'Jai Chingabunga' in Tollywood before the release of 'Dissco Sun' | 'डिस्को सन्या'च्या रिलीजआधीच टॉलिवूडमध्ये 'जय चिंगाबुंगा'

'डिस्को सन्या'च्या रिलीजआधीच टॉलिवूडमध्ये 'जय चिंगाबुंगा'

धारणत: मराठी चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांना तो किती आवडतो, बॉक्स आॅफीसवर तो किती कमाई करतो, हे पाहूनच त्या चित्रपटाच्या इतर भाषेतील रिमेकसाठीचा विचार केला जातो. परंतू वकाव फिल्म्स निर्मीत 'डिस्को सन्या' या चित्रपटाच्या बाबतीत मात्र काहीसं वेगळं आहे. चित्रपटाचा रिलीज जरी ५ आॅगस्ट होणार  असला तरी या चित्रपटाच्या दमदार कथेमुळे व नवनविन प्रयोगामुळे थेट टॉलिवूडमधून चित्रपटाच्या रिमेकसाठीची मागणी करण्यात आली आहे. टॉलिवूडचा सुपरस्टार अशोक कुमार याने निमार्ते संगीतकार सचिन-अभिजीत यांच्या 'डिस्को सन्या'च्या तमिळ रिमेकसाठीचे राईट्स घेतल्याची घोषणा पुणे येथे करण्यात आली आहे. याविषयी अशोक कुमार म्हणाले, चित्रपटाच्या रिलीजआधीच तमिळ रिमेकच्या घोषणेने चित्रपटाची कथा किती दमदार असेल, याचा अंदाज येतो. नियाज मुजावर दिग्दर्शित 'डिस्को सन्या' या चित्रपटाचा कॉमेडी जॉनर जरी असला तरी त्यातून प्रेक्षकांच्या मनातली हरवलेली माणूसकी जागविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, ही गोष्ट मला भावली आणि म्हणूनच हा सिनेमा मी तमिळ रिमेकमध्ये करण्याचा निर्णय घेतला. अशोक कुमारने टॉलिवूडमध्ये कन्नीघापुरम संधीप्पील, होम स्टे, दिघी, उला अशा अनेक ब्लॉकबस्टर फिल्म्स दिल्या आहेत. प्रेक्षकांना भावणारी उत्तम कथा, दमदार अभिनय, सामाजिक संदेश देउन मनोरंजनातून अंजन देणारा डिस्को सन्या जसा मला भावला तसा हा मराठी आणि साऊथ कडील सिनेरसिकांना ही नक्कीच भावेल, असेही तो म्हणाला. 
 

Web Title: 'Jai Chingabunga' in Tollywood before the release of 'Dissco Sun'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.