ऐकावं ते नवलच ! मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या या प्रसिद्ध अभिनेत्रींनी मैत्रीसाठी चक्क केलं एकत्र टक्कल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 11:40 AM2020-12-07T11:40:04+5:302020-12-07T11:40:57+5:30

मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या या प्रसिद्ध अभिनेत्रींनी मैत्रीसाठी चक्क केलं एकत्र टक्कल

It's new to listen to! These famous actresses from Marathi Cineindustry worked together for friendship | ऐकावं ते नवलच ! मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या या प्रसिद्ध अभिनेत्रींनी मैत्रीसाठी चक्क केलं एकत्र टक्कल

ऐकावं ते नवलच ! मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या या प्रसिद्ध अभिनेत्रींनी मैत्रीसाठी चक्क केलं एकत्र टक्कल

googlenewsNext

मैत्री म्हणजे नेहमी सोबत देणारी साथ, आपला मदतीचा हात, जपून ठेवावी अशी सुंगधी कुपी आणि आपल्या हक्काची जादू की झप्पी! त्यात अनेकजण मैत्रीत काहीही करायला तयार असतात. असेच काहीसे मराठी सिनेइंडस्ट्रीतील या तीन अभिनेत्रींनी मैत्रीसाठी काहीपण म्हणत आपल्या डोक्याच्या मागील बाजूचे केस मुळासकट काढले आहेत आणि सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. त्याचे हे फोटो पाहून त्याचे चाहते अवाक् झाले आहेत. या अभिनेत्री म्हणजे मनवा नाईक, अदिती सारंगधर आणि अमृता संत.

मनवा नाईक, आदिती सारंगधर आणि अमृता संत.या तिघींनी एकत्र येत आपल्या मैत्रीतील मजामस्ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. एक व्हिडिओ शेअर करून मनवा नाईकने आम्ही फ्रेंड्स आहोत की कोण? असे म्हणत डोक्याच्या पाठीमागील भागाचे केस मुळासकट काढून टाकले आहेत. या व्हिडीओत या तिघी भलत्याच आनंदी दिसत आहेत. या तिघींनी असे का केले असा अनेकांना प्रश्न पडला आहे.


मनवा, अमृता आणि आदिती या तिघी मैत्रिणी अनेकदा एकत्रित पाहायला मिळतात. या तिघींच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर मनवा नाईक सध्या मालिकेतून काम करत नसली तरी एक निर्माती म्हणून ती या क्षेत्रात स्थिरस्थावर आहे.

तर आदिती सारंगधर स्वराज्यजननी जिजामाता मालिकेतून बेगम साहिबाची भूमिका निभावत आहे. अमृता संत बऱ्याच नाटकांमध्ये झळकली आहे. 

 

Web Title: It's new to listen to! These famous actresses from Marathi Cineindustry worked together for friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.