अस्तु होणार १५ जुलैला प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 20:29 IST2016-07-03T14:59:44+5:302016-07-03T20:29:44+5:30
आंतरराष्ट्रीय महोत्सव, राष्ट्रीय पुरस्कारांसह तब्बल २७ पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविणारा 'अस्तु' हा चित्रपट १५ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झालाय. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, अभिनेत्री अमृता सुभाष, इरावती हर्षे, देविका दफ्तरदार,मिलिंद सोमण आदी कलाकारांचा समावेश आहे.

अस्तु होणार १५ जुलैला प्रदर्शित
आ तरराष्ट्रीय महोत्सव, राष्ट्रीय पुरस्कारांसह तब्बल २७ पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविणारा 'अस्तु' हा चित्रपट १५ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झालाय. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, अभिनेत्री अमृता सुभाष, इरावती हर्षे, देविका दफ्तरदार,मिलिंद सोमण आदी कलाकारांचा समावेश आहे. तसेच या चित्रपटाचं लेखन सुमित्रा भावे व दिग्दर्शन सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांनी केलं असून, संगीत दिग्दर्शन धनंजय खरवंदिकर व साकेत कानेटकर यांनी केलं आहे. संस्कृत स्कॉलर असलेल्या चक्रपाणी शास्त्री यांना उतारवयात स्मृतीभंशचा विकार होतो. वर्तमानाचा हात सोडून ते दुसºयाच गोष्टीत रमू लागतात. त्यातून मग सुरु होते ती, त्या व्यक्तीचा सांभाळ करणाºया कुटुंबाची कुचंबणा... अशी काहीसं या सिनेमाचं कथानक आहे.