संतोष जुवेकरचं झालंय लग्न?, सोशल मीडियावर होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 19:26 IST2023-07-14T19:26:33+5:302023-07-14T19:26:53+5:30
Santosh Juvekar : संतोष जुवेकरने झेंडा, मोरया, एक तारा, रेगे, रावरंभा अशा बऱ्याच चित्रपटात काम केले आहे.

संतोष जुवेकरचं झालंय लग्न?, सोशल मीडियावर होतेय चर्चा
मराठी सिनेइंडस्ट्रीतील बऱ्याचशा कलाकारांनी काम मिळवण्यासाठी मोठा स्ट्रगल केला आहे. हा स्ट्रगल संतोष जुवेकर(Santosh Juvekar)लाही चुकलेला नाही. संतोष जुवेकरने झेंडा, मोरया, एक तारा, रेगे, रावरंभा अशा बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्याला रॅपिड फायर राउंडमध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले त्यातच त्याला ‘लग्न झालं आहे का?’ असाही प्रश्न विचारला. त्यावेळी संतोषने ‘नाही’ असे उत्तर दिले. गुगलवर संतोष जुवेरकचं लग्न झाले असल्याची माहिती आहे. मात्र त्याने ही अफवा असल्याचे म्हटले आहे.
संतोष जुवेकर अजूनही सिंगल आहे असे तो म्हणतो मात्र जाणकार प्रेक्षकांनी त्याचे हे विधान खोटे असल्याचे म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने संतोष जुवेकरचे लग्न झाले होते आणि तो आदेश बांदेकर यांच्या होम मिनिस्टरमध्ये त्याच्या बायकोसोबत आला होता असे म्हटले आहे. त्यावर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया देताना संतोषचे लग्न झाले असल्याचं म्हणत बातमीला दुजोरा दिला आहे. मात्र संतोष लग्न न झाल्याचे म्हणतो हे या युजर्सना मुळीच पटलेले नाही.
मीडियाला दिलेल्या मुलाखतीत संतोषला बरेचसे प्रश्न विचारण्यात आले. कोणी तुला प्रपोज केलं आहे का? असा प्रश्न सुद्धा विचारला तेव्हा संतोष त्याचे उत्तर देताना म्हणतो की, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मला अनेक जणींनी प्रपोज केले आहे. पण या सर्वांचे माझ्या अभिनयावर प्रेम आहे म्हणून एक चाहते म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो.