‘आर्ची’ फॅन्समुळं उद्योगमंत्री ‘सैराट’,.. 'झिंगाट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 12:39 IST2016-05-10T07:09:07+5:302016-05-10T12:39:07+5:30

हॅलो रिंकू... हाय रिंकू... तुझा सैराट बघितला.. एकदम झक्कास.. तू तर कमालच केली आहेस. तुझं खूप खूप अभिनंदन... नागराज ...

Industry Minister 'Sarat', 'Zhengat' due to Archie Fans | ‘आर्ची’ फॅन्समुळं उद्योगमंत्री ‘सैराट’,.. 'झिंगाट'

‘आर्ची’ फॅन्समुळं उद्योगमंत्री ‘सैराट’,.. 'झिंगाट'

style="text-align: justify;">हॅलो रिंकू... हाय रिंकू... तुझा सैराट बघितला.. एकदम झक्कास.. तू तर कमालच केली आहेस. तुझं खूप खूप अभिनंदन... नागराज मंजुळेचंही कौतुक.. फोनवरील हे संभाषण.. फोनच्या पलीकडे असलेल्या व्यक्तीचे संभाषण.. नागराज मंजुळेच्या सैराटनं अवघ्या महाराष्ट्राला याड लावलं आहे. त्यामुळं या सिनेमातील आर्ची फेम राजगुरुशी बोलण्याची संधी कोण बरं दवडेल.
rinku
हीच संधी महाराष्ट्रातील अनेकांना मिळाली.. त्यांनी फोनही लावला.. भडाभडा आर्चीचं कौतुकही केलं.. मात्र फोनच्या दुस-या बाजूला आर्ची फेम रिंकू नाही तर चक्क राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई असल्याचं समोर आलं आणि अनेकांची निराशाच झाली.. हे खरं आहे.. हे सारं घडलं आहे एका फोन नंबरमुळे. हा फोन नंबर म्हणजे सुभाष देसाई यांचा.. त्यांचा हा नंबर कुणीतरी रिंकू राजगुरुच्या वेबपेजवर कुणी तरी टाकला..
subhash desai
त्यनंतर सुरु झाला हा फोनचा सिलसिला.. सध्या सैराटच्या यशामुळं सर्वत्र रिंकू आणि सिनेमाची चर्चा सुरु आहे. त्यामुळं कदाचित फोन करणा-यानं चुकून फोन लावला असेल असं समजून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.. राँग नंबर सांगून त्यांनी फोन ठेवला. नंतर मात्र फोन वाजतच राहू लागले. रिंकूच्या अभिनंदनाचा हसतमुखाने स्वीकार करत आपण रिंकू नाही असं देसाई यांनी नम्रपणे सांगण्यास सुरुवात केली.
rinku rajguru
मात्र तरी रिंकूच्या अभिनयास रसिकांनी दिलेल्या पोचपावतीचे दिवसभर साक्षीदार ठरल्याची भावना देसाई यांनी व्यक्त केलीय.. फोन सोबतच एसएमएस रिंगटोनही क्षणाक्षणाला वाजत होती.. या फोन आणि एसएमएसमुळे उद्योगमंत्र्यांची दिवस अक्षरक्ष झिंगाट झाला एवढं मात्र नक्की... 

Web Title: Industry Minister 'Sarat', 'Zhengat' due to Archie Fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.