अखेर स्वप्न सत्यात उतरलं! अतुल गोगावलेने खरेदी केली ड्रीम बाईक; किंमत ऐकून होतील डोळे पांढरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 19:55 IST2022-06-16T19:54:20+5:302022-06-16T19:55:20+5:30
Atul gogavale: अतुल गोगावले यांना गेल्या कित्येक काळापासून त्याची स्वप्नातील बाईक खरेदी करायची होती. अखेर ही बाईक त्यांनी स्वकष्टातून खरेदी केली आहे.

अखेर स्वप्न सत्यात उतरलं! अतुल गोगावलेने खरेदी केली ड्रीम बाईक; किंमत ऐकून होतील डोळे पांढरे
आपल्या दर्जेदार गाण्यांमुळे घराघरात पोहोचलेली संगीतकार भावांची जोडी म्हणजे अजय-अतुल. आजवरच्या कारकिर्दीत या दोघांनीही मराठी कलाविश्वाला अनेक सुंदर आणि लोकप्रिय गाणी दिली. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची कायम चर्चा होत असते. प्रत्येक वेळी गाण्यामुळे चर्चेत येणारी ही जोडी यावेळी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. या दोघांचं स्वप्न नुकतंच पूर्ण झालं आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या या जोडीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी नुकतीच त्यांची ड्रीम बाईक खरेदी केल्याचं दिसून येत आहे. अतुल गोगावले यांना गेल्या कित्येक काळापासून त्याची स्वप्नातील बाईक खरेदी करायची होती. अखेर ही बाईक त्यांनी स्वकष्टातून खरेदी केली आहे. या नव्या पाहुण्याचं त्यांनी दणक्यात स्वागत केलं असून त्याची झलकही चाहत्यांना दाखवली आहे.
"मी माझ्या स्वप्नातील bike BMW R1250 GS ही बाइक घेतली आहे. आणि मला एकचं सांगाचे आहे ही खूपच बेस्ट आहे", असं कॅप्शन देत त्यांनी ही पोस्ट शेअर केली. विशेष म्हणजे ही बाईक प्रचंड महाग असून त्याची किंमत थक्क करणारी आहे.
बीएमडब्ल्यू R1250 GS अॅडव्हेंचर प्रो या बाइकची किंमत किंमत २२ लाखांपर्यंत असल्याचं सांगण्यात येतं. २०१८ मध्ये कंपनीने ही बाईक भारतात लाँच केली. R 1250 GS रेंजच्या मॉडेलमध्ये कंपनीने अनेक शानदार अपडेट दिले आहेत.या बाइकमध्ये अनेक लेटेस्ट फीचर्स आहेत. स्टँडर्ड रायडिंग मोड्सशिवाय या बाइकमध्ये प्रो रायडिंग मोड देखील आहे.