"भावनिक आणि मातीतलं देशील ना तर...", भरत जाधवने मराठी प्रेक्षकांबद्दल केलं मत व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 16:45 IST2025-04-22T16:44:04+5:302025-04-22T16:45:30+5:30
Bharat Jadhav : अभिनेता भरत जाधवने एका मुलाखतीत मराठी प्रेक्षकांबाबतचे आपले मत व्यक्त केले आहे.

"भावनिक आणि मातीतलं देशील ना तर...", भरत जाधवने मराठी प्रेक्षकांबद्दल केलं मत व्यक्त
भरत जाधव (Bharat Jadhav) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात छाप उमटविली आहे. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात त्याने काम केले आहे. दरम्यान आता एका मुलाखतीत त्याने मराठी प्रेक्षकांबाबतचे आपले मत व्यक्त केले आहे.
अभिनेता भरत जाधवने नुकतेच व्हायफळ गप्पा या पॉडकास्टमध्ये मुलाखत दिली. यावेळी त्याने म्हटले की, आपल्या इथे हिरो म्हणजे ६ पॅक्सचं हवे असं काही नाही आहे. मराठीचा तो प्लस पॉइंट आहे. मराठीत भव्यता खूप चालतं असं मला वाटत नाही, पण तू भावनिक आणि मातीतलं देशील ना तर लोकांना आवडतं. इतकी वर्ष लोकांना तेच आवडत आलंय. आता पण तेच आवडतंय. पण तुम्ही छान पद्धतीने मांडा ते.
''त्यांना ते जवळचं वाटते...''
राजा गोसावी साहेब घ्या किंवा दादा कोंडके त्यांचे चित्रपट घ्या किंवा अजून आपल्याकडे बरीच नावं आहेत. सगळ्याचा विचार केल्यावर आपल्याला कळतं की लोकांना ना त्यांनी हिरो म्हणून बघितलं नाही. लोकांनी त्यात अरे मस्त आहे. माझ्या जवळचं आहे. तू आमच्यातील चेहरा दिसावा, आम्ही तुला त्यात पाहतोय. आमचं फ्रस्ट्रेशन असेल, आमचा प्रॉब्लेम असेल, तर आमच्यासमोर कॉमन मॅनच असेल ना. तर तो काय करेल, तो कसा त्यातून बाहेर पडेल, त्यात भावनिक गुंतागुंत असेल, थोडसं निखळ मनोरंजन असेल तर लोक त्याचं कौतुक करतात. त्यांना ते जवळचं वाटते, असे त्याने यावेळी म्हटले.