"मुन्नाभाई MBBSच्या वेळी जर मी...", अभिनेत्री प्रिया बापटने व्यक्त केली 'ही' खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 12:45 IST2025-02-03T12:44:35+5:302025-02-03T12:45:20+5:30

Priya Bapat: अलिकडेच एका मुलाखतीत प्रिया बापटने मुन्नाभाई एमबीबीएस सिनेमाबद्दल बोलताना एक खंत व्यक्त केली.

''If I had during Munnabhai MBBS Movie...'', Actress Priya Bapat expressed 'this' regret | "मुन्नाभाई MBBSच्या वेळी जर मी...", अभिनेत्री प्रिया बापटने व्यक्त केली 'ही' खंत

"मुन्नाभाई MBBSच्या वेळी जर मी...", अभिनेत्री प्रिया बापटने व्यक्त केली 'ही' खंत

राजकुमार हिराणी (Rajkumar Hirani) दिग्दर्शित 'मुन्नाभाई एमबीबीएस' (Munnabhai MBBS Movie) या चित्रपटात मुन्ना (संजय दत्त) सोबत वैद्यकीय विद्यार्थिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आठवतेय का? ही अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट (Priya Bapat). प्रिया बापटने चित्रपटाच्या सीक्वल 'लगे रहो मुन्ना भाई'मध्ये आणखी महत्त्वाची भूमिका साकारली होती. प्रियाने मराठी चित्रपटांमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. याव्यतिरिक्त, तिने सिटी ऑफ ड्रीम्स या वेब सीरीजमध्ये राजकारणी पूर्णिमा गायकवाडच्या तिच्या उल्लेखनीय भूमिकेद्वारे हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्ये ओळख मिळवलीय.

अलिकडेच एका मुलाखतीत प्रिया बापटने मुन्नाभाई एमबीबीएस सिनेमाबद्दल बोलताना एक खंत व्यक्त केली. डिजिटल कॉमेंट्रीसोबत केलेल्या संवादात ती म्हणाली की, मी मुन्नाभाई एमबीबीएस केला होता तेव्हा मला माहित नव्हते की मला अभिनेत्री व्हायचे आहे. २००७ मध्ये जेव्हा मी माझी प्रमुख भूमिका असलेला मराठी सिनेमा केला तेव्हा मी कलाकार व्हायचा निर्णय घेतला. तोपर्यंत मी बालकलाकार म्हणून बरेच काम करत होते. टेलिव्हिजन कमर्शिएल्स करत होते. मराठी चित्रपट करत होते. सगळी कामे करत होते पण मी ठरवलेच नव्हते अभिनय करायचे. कारण मी अभिनयाव्यतिरिक्त शिकतदेखीत होते. 

प्रियाला वाटते या गोष्टीची खंत

प्रिया पुढे म्हणाली की, मुन्नाभाईच्या वेळेची मला एका गोष्टीची खूप खंत वाटत होती. ती म्हणजे कदाचित जर मला आधीच माहित असते की मला काय करायचे आहे तर कदाचित माझा प्रवास वेगळा असला असता. 

वर्कफ्रंट
प्रिया बापट शेवटची रात जवां है या हिंदी सीरिजमध्ये पाहायला मिळाली. याशिवाय ती विस्फोट या हिंदी सिनेमात झळकली आहे. यात तिच्यासोबत रितेश देशमुख, फरदीन खान आणि क्रिस्टल डिसुझा मुख्य भूमिकेत होते. सध्या तिच्या जर तरची गोष्ट या नाटकाचे परदेशात प्रयोग सुरू आहेत. यात प्रियासोबत उमेश कामत, पल्लवी पाटील आणि आशुतोष गोखले मुख्य भूमिकेत आहे.

Web Title: ''If I had during Munnabhai MBBS Movie...'', Actress Priya Bapat expressed 'this' regret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.