अभिज्ञानाला ओढ लागली वेबसिरीजची
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2017 17:39 IST2017-07-17T12:09:23+5:302017-07-17T17:39:23+5:30
मराठी इंडस्ट्रीमध्ये वेबसीरीजची धूम पाहायला मिळतेय.चित्रपट, लघुपट आणि मालिकानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेब सिरीजची चलती असल्याचे पाहयाला मिळतंय. ...

अभिज्ञानाला ओढ लागली वेबसिरीजची
म ाठी इंडस्ट्रीमध्ये वेबसीरीजची धूम पाहायला मिळतेय.चित्रपट, लघुपट आणि मालिकानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेब सिरीजची चलती असल्याचे पाहयाला मिळतंय. चित्रपटाप्रमाणेच या वेब शोची चर्चा ही सध्य़ा रंगताना दिसते आहे. त्याचबरोबर आता कलाकार छोटा पडदा नाही तर या वेबसिरीजकडे वळताना दिसतायेत.छोट्या पडद्यावरची मोनिका म्हणजेच अभिज्ञा भावे आता एका वेबसिरीजमध्ये झळकणार आहे.लग्नाच्या वयात आलेल्या मुलीसाठी तिचे आई-बाबा वरसंशोधन करतात तेव्हा ती मुलगी कोणत्या मानसिकतेतून जात असते यावर आधारित एका वेबसिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे. टीव्हीवर चालणा-या सासू-सूनेच्या सिरीयल आणि तेच ते रिअॅलिटी शोज पाहून जर तुम्ही कंटाळलेले असाल, काही तरी हटके पाहण्याच्या विचारात असाल तर वेबसिरीज हा एक उत्तम पर्याय. मराठीमध्ये 'कास्टिंग काउच','स्ट्रगलर साला',बॅक बेंचर्स यासारख्या इतर वेबसिरीजने प्रेक्षकांमध्ये चांगली धूम उडवली असल्याचे पाहायला मिळाले. तसेच या वेब सिरीजला मिळणारा प्रतिसाद पाहता या वेबसिरीजमध्ये मराठी कलाकार आवर्जुन हजेरी लावताना दिसले.आता या सगळ्ंया लिस्टमध्ये आणखी एक हटके वेबसिरीज रसिकांच्या भेटीला येणार आहे. मुव्हींग आऊट या नावाची वेब सिरीज रसिकांना पाहायला मिणार आहे.या वेबसिरीजमध्ये अभिज्ञा भावे झळकणार आहे.ही लग्नाच्या वयात आलेल्या मुलीसाठी लग्नासाठी स्थ सोधण्याची प्रोसेस आणि त्यावेळी मुलीची मानसिकता यावर आधारित ही वेबसिरीज असणार आहे.सध्या अभिज्ञा भावे खुलता कळी खुलेना या मालिकेत मोनिका नावाची भूमिका साकरातेय. मालिकेतल्या या भूमिकेला थोडी नेगेटीव्ह शेड असली तरीही तिच्या भूमिकेला रसिकांची पसंती मिळतेय.आता वेबसिरीजच्या माध्यमातून एक नव्या भूमिकेत ती रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.