"...काय होऊ शकतं, ते मी अनुभवलं", केक कापण्यापूर्वी श्रेयस तळपदेनं केली प्रार्थना, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 19:44 IST2024-01-27T19:44:37+5:302024-01-27T19:44:52+5:30
अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) २७ जानेवारीला त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. डिसेंबर २०२३ मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. आता तो बरा असून त्याने त्याचा वाढदिवस पापाराझींसोबत साजरा केला आहे.

"...काय होऊ शकतं, ते मी अनुभवलं", केक कापण्यापूर्वी श्रेयस तळपदेनं केली प्रार्थना, व्हिडीओ व्हायरल
अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) २७ जानेवारीला त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. डिसेंबर २०२३ मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. 'वेलकम टू द जंगल' चित्रपटाच्या शूटिंगवरून परतताना त्याला अस्वस्थ वाटू लागले, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तो आता बरा असून त्याने त्याचा वाढदिवस पापाराझींसोबत साजरा केला आहे.
श्रेयस तळपदेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो पिवळा टी-शर्ट आणि डेनिममध्ये दिसत आहे. पॅप्सने विचारले, सर, तुम्ही कसे आहात? तर अभिनेता म्हणाला की, मी चांगला आहे. यानंतर त्याने स्वतःच विचारले की कसा वाटतोय मी? पॅप्स म्हणाले - सर तुम्ही चांगले दिसत आहात, मग अभिनेता फक्त म्हणाला, (हेच मला ऐकायचे होते). त्यानंतर पुष्पाची सिग्नेचर पोझ करुन केक कापला.
केक कापण्यापूर्वी श्रेयस तळपदे यांची प्रार्थना
केकवरील मेणबत्ती विझवण्यापूर्वी श्रेयस तळपदे याने प्रार्थना केली, 'देव सर्वांना उत्तम आरोग्य देवो हीच प्रार्थना. कारण एखाद्याचे आरोग्य चांगले नसेल तर काय होऊ शकते हे मी अनुभवले आहे. त्यामुळे असे कोणाच्याही बाबतीत होऊ नये अशी माझी इच्छा आहे. हे वर्ष सर्वांना उत्तम आरोग्य देवो. यानंतर त्याने केक कापला.
श्रेयस तळपदेवर चाहत्यांनी शुभेच्छांचा केला वर्षाव
श्रेयस तळपदेला असे पाहून चाहते खूश झाले. सर्वांनी अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एका यूजरने लिहिले की, 'श्रेयस प्रत्येकाला हसवत असतो आणि त्यामुळेच त्याला सर्वांचे आशीर्वाद मिळतात.' एकजण म्हणाला, 'तो खरा माणूस आहे.' एकाने लिहिले, 'तू चांगली व्यक्ती आहेस. तू नेहमी चांगले राहाल. काळजी करू नका. गणपती बाप्पा मोरया.