'पाहिले न मी तुला' चित्रपटाचा मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 04:40 IST2016-01-16T01:08:38+5:302016-02-12T04:40:53+5:30

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं हे तर खरंच आहे, पण प्रत्येकाला येणार्‍या अडचणी, अनुभव ...

'I am not sure' of the movie | 'पाहिले न मी तुला' चित्रपटाचा मुहूर्त

'पाहिले न मी तुला' चित्रपटाचा मुहूर्त

रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं हे तर खरंच आहे, पण प्रत्येकाला येणार्‍या अडचणी, अनुभव काही प्रमाणात वेगळे असतातच. यादरम्यान घडणार्‍या घटना, त्या घटनांचे त्या दोघांवर आणि इतरांवर होणारे परिणामही निराळे असतात. अशाच एका कथेवर आधारित 'पाहिले न मी तुला' हा चित्रपट घेऊन येत आहेत दिग्दर्शक गणेश कदम. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच झाला.
चेतन किंजाळकरलिखित या प्रेमकथेत जीवनात घडणार्‍या काही अकल्पित घटनांची आणि त्याच्या परिणामांची कथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात यश कदम, सौरभ गोखले, मधुरा देशपांडे, सुरेश डाळे, कांचन पगारे आदी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटातील गाण्यांसाठी स्वप्निल बांदोडकर, वैशाली माडे, अभिजित कोसंबी, केतकी माटेगावकर गायक-गायिकांनी आवाज दिला आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून राजनंदा प्रॅाडक्शन्स या वेगळ्या धाटणीच्या प्रेमकथेची निर्मिती करीत आहे.

Web Title: 'I am not sure' of the movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.