गणेश चतुर्थीला हृता दुर्गुळेच्या घरी आली नवीन पाहुणी, फोटो शेअर करत दिली खुशखबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 11:24 IST2025-08-29T11:22:36+5:302025-08-29T11:24:27+5:30

Hruta Durgule : हृता दुर्गुळे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या ती तिच्या आरपार या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात तिच्यासोबत ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच अभिनेत्रीने चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे.

Hruta Durgule and Pratik Shah bought new car BMW on the occassion of Ganesh Chaturthi, shared the good news by sharing a photo | गणेश चतुर्थीला हृता दुर्गुळेच्या घरी आली नवीन पाहुणी, फोटो शेअर करत दिली खुशखबर

गणेश चतुर्थीला हृता दुर्गुळेच्या घरी आली नवीन पाहुणी, फोटो शेअर करत दिली खुशखबर

हृता दुर्गुळे (Hruta Durgule) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या ती तिच्या आरपार या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात तिच्यासोबत ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच अभिनेत्रीने चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. हृताचा पती प्रतीक शाह(Pratik Shah)ने गणेश चतुर्थीला नवीन आलिशान कार घेतली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

प्रतीक शाहने निळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कार घेतली आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी लिहिले, यंदाच्या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाने आम्हाला नवीन चाकांसह आशीर्वाद दिला. गणपती बाप्पा मोरया. प्रतीकने शेअर केलेल्या फोटोत हृता सह तिची सासू मुग्धा शाहदेखील पाहायला मिळत आहे. प्रतीकच्या या पोस्टवर हृताने कमेंट केली आहे. तिने लिहिले, तुझा खूप अभिमान वाटतो. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रेटींनीही अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.


हृता दुर्गुळेने कारकीर्दीची सुरुवात मालिकेतून केली. दुर्वा ही तिची पहिली मालिका होती. फुलपाखरू मालिकेतून ती घराघरात पोहोचली. हृताचा चाहता वर्ग मोठा आहे. हृताने अनेक मालिका, नाटक आणि काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. याशिवाय 'मन उडू उडू झालं' या मालिकेत ती दिसली होती. 'टाइमपास ३', 'अनन्या', 'सर्किट', 'कन्नी' या सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. 'कमांडर करण सक्सेना' या हिंदी वेब सीरिजमध्येही हृता झळकली आहे. त्यानंतर आता लवकरच तिचा आरपार हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Hruta Durgule and Pratik Shah bought new car BMW on the occassion of Ganesh Chaturthi, shared the good news by sharing a photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.