सलमान खाननंतर हृतिक रोशननेही सोशल मीडियावर जाहीर केली या मराठी सिनेमाची प्रदर्शनाची तारिख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2017 12:21 IST2017-04-14T06:51:32+5:302017-04-14T12:21:32+5:30

नुकतेच महेश मांजरेकरच्या एफयु सिनेमाची प्रदर्शनाची तारिख सलमान खानने  ट्विट करून जाहीर केली होती.आता पुन्हा एका बॉलिवूडच्या स्टारने मराठी ...

Hrithik Roshan announced on social media after the release of the Marathi film | सलमान खाननंतर हृतिक रोशननेही सोशल मीडियावर जाहीर केली या मराठी सिनेमाची प्रदर्शनाची तारिख

सलमान खाननंतर हृतिक रोशननेही सोशल मीडियावर जाहीर केली या मराठी सिनेमाची प्रदर्शनाची तारिख

कतेच महेश मांजरेकरच्या एफयु सिनेमाची प्रदर्शनाची तारिख सलमान खानने  ट्विट करून जाहीर केली होती.आता पुन्हा एका बॉलिवूडच्या स्टारने मराठी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख ट्विट केली आहे.त्यामुळे बॉलिवूडकरांचा मराठी सिनेमाला चांगलाच पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. विक्रम फडणीस दिग्दर्शित‘हृदयांतर’ या मराठी सिनेमाची सुपरस्टार हृतिक रोशनने रिलीज डेट ट्विट केली आहे.विक्रम फडणीस दिग्दर्शित हृदयांतर चित्रपटामध्ये सोनाली खरे, मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत. विशेष म्हणजे या सिनेमात हृतिक रोशनही झळकणार असून रूपेरी पडद्यावर . हृतिक मराठी बोलताना पाहायला मिळणार आहे. पाहुण्याकलाकाराच्या भूमिकेत हृतिक ‘हृदयांतर​ सिनेमात पाहायला मिळणार आहे.
 


'बॉलिवूडचा हँडसम हंक' म्हणून ओळखल्या जाणा-या हृतिक रोशन सोशल नेटवर्किंग साइटवरून‘हृदयांतर’ चित्रपटाच्या रिलीज डेट 9 जून 2017 असल्याचं जाहिर केले आहे.त्याने ट्विट करताना म्हटले,“ मी ज्या सिनेमाचा हिस्सा आहे. त्या सिनेमाची रिलीजची तारीख जाहिर करताना मला आनंद होतोय. ‘हृदयांतर’ हा सिनेमा माझा मित्र विक्रम फडणीसने दिग्दर्शित केला आहे." निर्माता पुर्वेश  सरनाईक, म्हणतो, "हृदयांतर सिनेमा, कुटुंब आणि नातेसंबंधांवर आधारित आहे. हा सिनेमा माझ्या हृदयाच्या अतिशय जवळचा आहे. हा सिनेमा बनवण्याची आणि पोस्ट प्रॉडक्शनची प्रक्रिया आम्ही सर्वांनीच खूप एन्जॉय केली. अनेक लोकं मला सांगतायत, की ते सध्या या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत."निर्माता आणि दिग्दर्शक विक्रम फडणीस म्हणतो, " मी सध्या खूप उत्साहित आहे. मी या  सिनेमावर गेली तीन वर्ष आम्ही काम करतोय. आणि आता शेवटी  9 जूनला  सिनेमा रसिकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. एकीकडे आनंद वाटत असून थोडं दडपणही आल्यांचे त्याने म्हटले आहे.




Web Title: Hrithik Roshan announced on social media after the release of the Marathi film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.