पैसा अभावी माणसे कशी बदलतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 18:54 IST2016-05-18T13:24:04+5:302016-05-18T18:54:04+5:30

पैसा हा प्रत्येकाच्या जीवनातील अमुल्य गोष्ट आहे. कोणाला नको असतो पैसा. प्रत्येकजण पैसा कमविण्यासाठीच जीवनात धावपळ करत असतो. पैसा ...

How do people change their money? | पैसा अभावी माणसे कशी बदलतात

पैसा अभावी माणसे कशी बदलतात

सा हा प्रत्येकाच्या जीवनातील अमुल्य गोष्ट आहे. कोणाला नको असतो पैसा. प्रत्येकजण पैसा कमविण्यासाठीच जीवनात धावपळ करत असतो. पैसा है तो सबकुछ है. याच अ‍ॅटीटयूड मध्ये हल्ली माणसे नातीगोती विसरून जगत असतात. म्हणूनच म्हणतात की, भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवितो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवितो. याच पैसा अभावी माणसे कशी बदलतात यावर आधारित असणारा पैसा पैसा या चित्रपटाविषयी अभिनेता सचित पाटील याच्याशी लोकमत सीएनएक्सने साधलेला खास संवाद.

१. सचित पैसा पैसा या चित्रपटाविषयी काय सांगेल?
-  पैसा पैसा हा चित्रपट एका दिवसाच्या प्रवासावर आधारित आहे. या एक दिवसामध्ये फक्त दहा हजार रूपयांसाठी माणसे कशी बदलतात याचा प्रत्यय येतो. तसेच जी माणसे शुन्यातून वर आली आहेत त्यांना हा चित्रपट फार जवळचा वाटेल. वेगळा विषय असल्यामुळे हा चित्रपट खूप एन्जॉय केला आहे. 

2. या चित्रपटासाठी काही खास तयारी केली होती?
- खास तयारी करण्यासाठी वेळच मिळाला नाही. माझे शुटिंग सुरू होते, त्यावेळी अचानक व्हॅनिटीमध्ये दिग्दर्शक जोजी भेटायला आहे. व लगेच दोन दिवसानंतर चित्रपटाची शुटिंगदेखील चालू केली. कारण विषयदेखील तितकाच इंटरेस्टिंग वाटला. त्यामुळे चित्रपट साइन करण्याची घाई केली. 

३. खरंय आहे का? हे या चित्रपटात हिरो हिरोईन्सचा एकत्र असा एक ही शॉर्ट नाही?
- हो. याचे सर्व श्रेय दिग्दर्शक जोजी रेशल जॉब यांनाच जाईल.या चित्रपटाच्या शुटिंगच्या दरम्यान मी आणि स्पृहा फक्त एकदाच भेटलो आहोत. ते पण तिच्यासोबत अक्षरश: एकच गाणे शुट केले आहेत. तरी ही आमच्या जोडीला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद आला आहे. तुमची जोडी रूपेरी पडदयावर खूप सुंदर दिसते. स्पृहा देखील मला म्हणाली, या चित्रपटात आपल्याला एकत्रित काम करायला नाही मिळाले, त्यामुळे पुढचा चित्रपट मला तुझ्यासोबतच करायचा आहे. 

४. अ‍ॅक्शन या चॉकलेट हिरोच्या भूमिका आवडतात?
- खर सांगायच तर मला चांगल्या विषयात मज्जा येते. तसेच प्रत्येक कलाकाराला हेच आवडेल की, कोणत्याही भूमिकेत न अडकता नेहमी वेगवेगळया भूमिकेतून प्रेक्षकांसमोर उभे राहावे. फ्रेंडस, क्लासमेंटस यामध्ये देखील मी चॉकलेट भूमिकेत न अडकता वेगळया भूमिकेत झळकलो आहे. तसेच जी भूमिका मिळते त्याला शंभर टक्के देण्याचा माझा प्रयत्न असतो.

५. तू आणि स्पृहा पहिल्यांदा रूपेरी पडदयावर झळकत आहात? तर स्पृहाविषयी काय सांगेल?
- स्पृहा म्हटले की,उमेश कामतच समोर येतो. पण नवीन कलाकारासोबत काम करायला मिळत असल्यामुळे स्पृहा देखील  आनंद झाला आहे. त्याचबरोबर मला देखील स्पृहासोबत काम करायच होत. ती एक खूप छान अभिनेत्री आहे. पैसा पैसा या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांकडून ही आमच्या जोडीला छान प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांच्या कमेन्टंस देखील येत आहे की,जास्तीत जास्त सिनेमे एकत्र करा. त्यामुळे आम्ही ठरवलं आहे की, पुढच्या स्क्रीप्टवर एकत्रित काम करायचं. 

 ६. सचित तू स्वत: एक दिग्दर्शक आहे. तर तुझा हा अनुभव कसा होता?
- हा अनुभव माझा मस्तच होता. जरी मी स्वत: दिग्दर्शक असलो तरी, मला नेहमी दुसºयांकडून काही शिकता येईल हाच प्रयत्न असतो. आर्टिस्ट असो या दिग्दर्शक किवा निर्माता आपल्याला कधी ही कोणतीही भूमिका करावी लागू शकते. तसेच जोजीकडून एक अ‍ॅडफिल्म मेकर करतानाचा अ‍ॅप्रोच मिळाला.

                                                 


Web Title: How do people change their money?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.