"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
By देवेंद्र जाधव | Updated: April 28, 2025 11:06 IST2025-04-28T11:05:36+5:302025-04-28T11:06:05+5:30
केदार शिंदेंनी त्यांच्या आयुष्यात स्वामी समर्थ यांचं महत्व आणि भक्ती याचा उलगडा केलाय. कुटुंबात कोणीही स्वामी भक्त नव्हतं तरीही केदार शिंदेंच्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ कसे आले, याचा खास किस्सा त्यांनी सांगितला आहे (kedar shinde)

"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
केदार शिंदे (kedar shinde) हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक-अभिनेते. केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' सिनेमा (zapuk zupuk movie) नुकताच रिलीज झाला आहे. केदार शिंदे यांच्या या सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. केदार शिंदे त्यांच्या प्रत्येक मुलाखतीच्या वेळेस स्वामी समर्थांची त्यांच्या मनात किती भक्ती आहे, याविषयी प्रत्येक मुलाखतीत सांगतात. अशातच केदार शिंदेंनी एका मुलाखतीत "मी जगतोय ते त्यांच्यामुळे, नाहीतर मी मेलो असतो", असा खुलासा केला.
केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
केदार शिंदेंनी जस्ट नील थिंगच्या मुलाखतीत वक्तव्य केलंय की, स्वामी समर्थ आणि माझा काहीच संबंध नव्हता.आमच्या घराण्यात कोणी स्वामी समर्थांकडे गेलेलं नाही. ३ जुलै १९९७ ला मी पहिल्यांदा फ्रेम बघितली आणि वर लिहिलं होतं श्री स्वामी समर्थ. तेव्हा मला कळलं की, अच्छा हे स्वामी समर्थ आहेत. अपघाताने मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांनी मला जवळ घेतलं."
"दुसरी गोष्ट, मी जे मागतोय ते देतात असं नाही. त्यासाठी ते प्रचंड परीक्षा घेतात. पूर्णपणे रसातळाला गेल्यावर ते तुला हात देतात. पण परत हात देताना जी शक्ती लावायची असते ती तुलाच लावायची असते. अलगद असं काढून ते तुला काही देणार नाहीत."
"मी ज्या पद्धतीने काम केलंय त्या कामामध्ये मला अनेक त्रास झाले आहेत. मी खूप हरलोय, संपलोय, परत उठलोय. आपलं असं होतं की वाईट काळामध्ये आपण परमेश्वराचं नाव घेतो की, देवा, लक्ष ठेवा! जेव्हा आपली चांगली वेळ येते तेव्हा अलगद आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. मी एवढंच एक वाक्य म्हणेन की, मी जगतोय ते त्यांच्यामुळे, नाहीतर मी मेलो असतो."