रिंकू राजगुरूच्या फॅन्ससाठी खुशखबर, लारा दत्तासह झळकणार या हिंदी वेबसिरिजमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 17:27 IST2020-04-21T17:26:49+5:302020-04-21T17:27:47+5:30
ही वेबसिरिज २५ एप्रिलपासून हॉट स्टारवर सुरू होणार आहे.

रिंकू राजगुरूच्या फॅन्ससाठी खुशखबर, लारा दत्तासह झळकणार या हिंदी वेबसिरिजमध्ये
प्रेक्षकांची लाडकी सैराट गर्ल रिंकू राजगुरू आता हिंदी वेबसिरिजमध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे या वेबसिरिजमध्ये लारा दत्ता सोबत ती मुख्य भूमिकेत आहे. या वेबसिरिजचे नाव हंड्ररेट असे असून २५ एप्रिलपासून ही वेबसिरिज प्रेक्षकांना हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे. दो खिलाडी, प्रोब्लेम भारी अशी या वेबसिरिजची टॅगलाईन असून या वेबसिरिजच्या पोस्टरमध्ये आपल्याला लारा दत्ता आणि रिंकूला पाहायला मिळत आहे.
लारा दत्ता या पोस्टरमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसणार असून रिंकू गॉगल लावून एकदम बिनधास्त अंदाजात दिसत आहे. या वेबसिरिजमध्ये या दोघांसोबतच सुधांशू पांडे, परमीत सेठी, करण वाही, रोहिणी हट्टंगडी, अरुण नलावडे आणि मकरंद देशपांडे यांसारखे प्रसिद्ध कलाकार आहेत.
रिंकूची ही पहिलच वेबसिरिज असल्याने ती तिच्या या डिजिटल डेब्युसाठी खूप उत्सुक आहे. ती सांगते, माझ्या या डिजिटल डेब्यूसाठी मी खूप खूश असून मी यात कॉमेडी देखील करणार आहे. मी यात नेत्रा पाटील या भूमिकेत असून ती अतिशय बिनधास्त मराठी मुलगी आहे. तिला तिचे आय़ुष्य तिच्याप्रकारे जगायचे आहे. ही व्यक्तिरेखा मला प्रचंड आवडल्याने मी या वेबसिरिजमध्ये काम करायचे ठरवले.
रिंकूने या वेबसिरिजविषयी तिच्या चाहत्यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून देखील सांगितले आहे. तिने पोस्ट करत ट्रेलर लवकरच भेटीस येणार असल्याचे तिच्या चाहत्यांना सांगितले आहे.