Hotness Alert! या मराठी अभिनेत्रीचा बोल्ड अवतार, फोटो पाहून व्हाल खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 06:30 IST2019-12-02T06:30:00+5:302019-12-02T06:30:00+5:30

यापूर्वीदेखील या अभिनेत्रीनं बोल्ड व सेक्सी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Hotness Alert! Bhagyashree Mote shared Bold photo on Instagram | Hotness Alert! या मराठी अभिनेत्रीचा बोल्ड अवतार, फोटो पाहून व्हाल खल्लास

Hotness Alert! या मराठी अभिनेत्रीचा बोल्ड अवतार, फोटो पाहून व्हाल खल्लास

अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ असाच आहे. रुपेरी पडद्यावर तिचं फारसं दर्शन झालं नसलं तरी आपल्या या फोटोच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय. 

भाग्यश्रीने नुकतेच इंस्टाग्रामवर बोल्ड फोटो शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. भाग्यश्रीने इंस्टाग्रामवर क्लीवेज दाखवत बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप सेक्सी व बोल्ड दिसते आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. या फोटोत तिने जीन्सचं शॉर्ट जॅकेट व शॉर्ट्स घातली आहे. 

भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती.


भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता.


भाग्यश्री मोटे लवकरच एका बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे.


ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहेत.

हा चित्रपट पुढील वर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Hotness Alert! Bhagyashree Mote shared Bold photo on Instagram