मराठीमध्येही Hotness Alert पायांचे प्रदर्शन करणारी 'ती' पोस्टरगर्ल आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 13:31 IST2018-02-15T08:01:36+5:302018-02-15T13:31:36+5:30

हिंदी सिनेमाचे पोस्टर वर्षानुवर्षे अधिकाधिक बोल्ड होत चालले आहे.गेल्या काही वर्षात साध्या पोस्टरची जागा बोल्ड, सेक्सी आणि हॉट पोस्टर्सनी ...

Hotness Alert is also a postergirl who exhibits her feet in Marathi. | मराठीमध्येही Hotness Alert पायांचे प्रदर्शन करणारी 'ती' पोस्टरगर्ल आहे तरी कोण?

मराठीमध्येही Hotness Alert पायांचे प्रदर्शन करणारी 'ती' पोस्टरगर्ल आहे तरी कोण?

ंदी सिनेमाचे पोस्टर वर्षानुवर्षे अधिकाधिक बोल्ड होत चालले आहे.गेल्या काही वर्षात साध्या पोस्टरची जागा बोल्ड, सेक्सी आणि हॉट पोस्टर्सनी घेतली आहे.बॉलिवूडचा हा ट्रेंड हळूहळू मराठी सिनेमातही दिसू लागला.मराठी अभिनेत्रींनाही पोस्टरसाठी बोल्ड सीन देण्यात वावगं वाटत नसल्याचे पाहायला मिळत आहे.असंच एका बोल्ड पोस्टरची चर्चा सध्या मराठी चित्रपटसृष्टीत सुरु आहे.दिग्दर्शक विजू माने यांनी नुकतेच सोशल मीडियावर आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टरमध्ये एका मुलीचे फक्त पाय दिसत असून हे एका सिनेमाचे पोस्टर असले तरीही हा सिनेमा कोणता आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सेक्सी त़डका असलेला हा पोस्टर कोणते सिनेमाचे आहे हे गुपित ठेवण्यात आले आहे. तुर्तास हा सिनेमा महेश मांजरेकर यांची निर्मिती असून 20 एप्रिलला रसिकांच्या भेटीला येणार आहे.संतोष जुवेकर, कुशल बद्रीके, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव हे मराठी अभिनेते झळकणार असल्याची शक्यत असून पोस्टरमध्ये दिसणारी पोस्टरगर्ल सई ताम्हणकर,नेहा महाजन आणि नेहा जोशी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सोशल मीडियावर हे पोस्टर शेअर करताच हे पोस्टरमध्ये त्या पोस्टरगर्लनेच सा-यांच लक्ष वेधुन घेतले आहे. त्यामुळे अनेकजण पोस्टरवर दिसत असलेले पाय कोणाचे असा प्रश्न विचारताना दिसतायेत. तर कुणी वेगवेगळ्या अभिनेत्रींची नाव सांगत ही पोस्टरगर्लचे नाव जाणून घेण्यासाठी वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.सिनेमाचे पोस्टर इतके बोल्ड तर सिनेमाची कथा बोल्ड असणार असा अंदाजही लावला जात असल्याचे पाहायला मिळणार आहे. (Also Read:NUDE MMSमुळे चर्चेत आलेली नेहा महाजनचा हा व्हीडीओ या कारणामुळे पुन्हा एकदा आला चर्चेत)

या सिनेमा आधीही बोल्ड पोस्टरमुळेच अनेक मराठी सिनेमांची चर्चा झाली.'शटर','एडल्ट ओन्ली''चित्रफित' आणि 'न्युड' नुकताच प्रदर्शित झालेला 'गुलाबजाम' या सिनेमाचे पोस्टरसुद्धा बोल्ड आणि हॉट होते.यामुळे सिनेमाच्या शीर्षकाप्रमाणे बोल्ड पोस्टरमुळे या सिनेमाची चर्चा झाली. सिनेमाच्या पोस्टरचे महत्त्व आज चर्चेत आलं नसून गेल्या कित्येक वर्षांपासून पोस्टरने सिनेमाच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे.जुन्या जमान्यापासून ते आजतागायत पोस्टरमधून सिनेरसिकांना आकर्षित करण्यात येते.सुरुवातीच्या काळात अत्यंत साधं मात्र तितकेच आकर्षक असायचे.मात्र कालांतराने पोस्टरचे चित्र पालटले असल्याचे पाहाला मिळत आहे.

Web Title: Hotness Alert is also a postergirl who exhibits her feet in Marathi.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.