HOT & CUTE MITHIL PALKAR PHOTOS : प्रेमात पडावी अशी मराठी मुलगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 12:47 IST2017-01-23T07:17:26+5:302017-01-23T12:47:26+5:30

यूट्यूब आणि सोशल मीडियावर आवर्जुन अ‍ॅक्टिव्ह राहाणाऱ्यांना मिथिला पालकर हे नाव अपरिचित किंवा नवे नाही. नव्या युगातील सोशल मीडिया सेलिब्रेटी आहे मिथिला. सध्या ती ‘लिटल थिंग्स’ नावाच्या वेब सिरीजमध्ये काम करत आहे.

HOT & CUTE MITHIL PALKAR PHOTOS: Marathi girl like to fall in love | HOT & CUTE MITHIL PALKAR PHOTOS : प्रेमात पडावी अशी मराठी मुलगी

HOT & CUTE MITHIL PALKAR PHOTOS : प्रेमात पडावी अशी मराठी मुलगी

शल मीडिया स्टार मिथिला पालकर २०१६ मधील सरप्राईज ठरली. वेब सिरीज आणि व्हायरल व्हिडिओज्मध्ये झळकणारी मिथिलाचा आॅनलाईन कम्युनिटीवर प्रचंड फॅन बेस आहे. तिचे काही हॉट अँड क्यूट फोटोज् पाहुन तुम्ही तिच्या प्रेमात पडाल.

लोकप्रिय होण्यासाठी तुम्ही बॉलीवूड सेलिब्रेटीच असावे अशी गरज आज राहिलेली नाही. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या उद्रेकामुळे तुम्हीसुद्धा ‘टॉक आॅफ द टाऊन’ बनू शकता. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे मिथिला पालकर ही अस्सल मराठी पण मॉडर्न मुलगी.
 
यूट्यूब आणि सोशल मीडियावर आवर्जुन अ‍ॅक्टिव्ह राहाणाऱ्यांना मिथिला पालकर हे नाव अपरिचित किंवा नवे नाही.
 
अ‍ॅक्टर-मॉडेल अशी स्वत:ची ओळख सांगणारी मिथिला अनेक वेब सिरीज, व्हायरल व्हिडिओज्, जाहिरातींमधून झळकलेली आहे.
 
नव्या युगातील सोशल मीडिया सेलिब्रेटी आहे मिथिला. तरुणांशी निगडित अनेक कार्यक्रमांत ती दिसते.
 
अ‍ॅक्टिव्ह यूट्यूबर असणारी मिथिला ‘कन्फ्युजिंग थिंग्स अ गर्ल से’ नावाच्या यूट्यूब व्हिडिओज्मधून ती चर्चेत आली. हे व्हिडिओ व्हायरल होताच तिला अनेक वेबसिरीजच्या आॅफर येऊ लागल्या आणि ती इंटरनेट स्टार-इन डिमांड बनली.
 
सध्या ती ‘लिटल थिंग्स’ नावाच्या वेब सिरीजमध्ये काम करत आहे. तसेच ‘गर्ल इन द सिटी’मध्येसुद्धा ती दिसली होती.
 
तिने ‘कट्टी बट्टी’ या कंगणा रनौत आणि इम्रान खान स्टारर बॉलीवूड फिल्ममध्येसुद्धा काम केलेले आहे. यामध्ये ती इम्रानची बहीण होती.
 
मिथिलाचा जन्म मुंबईतील एका मराठी कुटुंबात झाला. अभिनयाची आवड लहानपणापासूनच असल्यामुळे मोठ्यापणी अ‍ॅक्टिंगमध्येच करिअर करायचे हे तिन मनाशी पक्के केले होते.
 
त्यानुसार मग ती शाळा-कॉलेजमध्ये विविध नाटकांत भाग घेऊ लागली. मुंबईच्या ‘एमएमके कॉलेज’मधून डिग्री मिळवल्यावर तिने अभिनयावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले.
 
‘तुझी चाल चाल तुरुतुरु’ हे गाणेसुद्धा तिने गायलेले आहे. रणबीर कपूर तिचा फेव्हरेट अ‍ॅक्टर असून त्याच्यासोबत काम करण्याची तिची इच्छा आहे.
 
 

(Title Photo Credit: Richa Kashelkar)

Web Title: HOT & CUTE MITHIL PALKAR PHOTOS: Marathi girl like to fall in love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.