असा आहे 'हॉस्टेल डेज' मराठी चित्रपटाचा ट्रेलर,१२ जानेवारीला होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 14:44 IST2018-01-06T09:14:37+5:302018-01-06T14:44:37+5:30

‘हॉस्टेल डेज’ हा एक सांगीतिक चित्रपट आहे.या चित्रपटात एकूण आठ मधुर गाणी आहेत आणि ती आघाडीच्या बॉलिवूड गायकांनी गायली आहेत.

The hostel days will be a trailer for Marathi film trailer, on January 12 | असा आहे 'हॉस्टेल डेज' मराठी चित्रपटाचा ट्रेलर,१२ जानेवारीला होणार प्रदर्शित

असा आहे 'हॉस्टेल डेज' मराठी चित्रपटाचा ट्रेलर,१२ जानेवारीला होणार प्रदर्शित

रख्यात लेखक,संगीत दिग्दर्शक आणि दिग्दर्शक अजय नाईक यांच्या बहुप्रतीक्षित ‘'हॉस्टेल डेज’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट १२ जानेवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून त्यांत प्रार्थना बेहेरे,आरोह वेलणकर, विराजस कुलकर्णी,अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अजय नाईक यांनी आत्तापर्यंत बावरे प्रेम हे, लग्न पाहावे करून आणि सतरंगी रे यांसारखे गाजलेले चित्रपट दिल्यानंतर ते आता पुन्हा एकदा 'हॉस्टेल डेज' या आगामी चित्रपटातून रसिकांसमोर येत आहेत.या चित्रपटाची प्रस्तुती श्री पार्श्व प्रॉडक्शन्स आणि ट्वेन्टी फोर स्टुडिओ यांनी केली आहे आणि चित्रपटाची निर्मिती श्री पार्श्व प्रॉडक्शनच्या सुभाष बोरा, चंदन गेहलोत आणि हरविंदर सिंग यांनी अजय नाईक प्रॉडक्शनच्या सहकार्याने केली आहे.त्याशिवाय या चित्रपटात प्रतिभावान कलाकारांचा एक अख्खा चमूच काम करत आहे.चिन्मय पटवर्धन, सागरिका रुकरी, पूर्वा देशपांडे, पूर्वा शिंदे, अंकिता लांडे आणि गणेश बिरंगल यांचा त्यांत समावेश आहे.

"हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात हॉस्टेलमधील दिवसांची एक वेगळी अशी विशेष आठवण असते. ज्यांनी हे हॉस्टेलचे आयुष्य कधीच अनुभवले नाही,त्यांना या आयुष्याबद्द्ल नेहमीच कुतूहल लागून राहिलेले असते. हॉस्टेलमधील त्या दिवसांबद्दल आठवण आली कि कोणीहि नॉस्टॅल्जिक होतोच," असे उद्गार चित्रपटाचे दिग्दर्शक अजय नाईक यांनी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करताना काढले.ही कथा आहे १९९४ मधील; साताऱ्यातील कोपरगाव या काल्पनिक ठिकाणी स्थित एका हॉस्टेलची.१९९०च्या या दशकात महाराष्ट्राच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये फार  मोठे बदल अनुभवले गेले. याच दशकात अनेक खासगी महाविद्यालये सुरु झाली.त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे विद्यार्थी शिक्षणासाठी येवू लागले.समाजामध्ये त्यामुळे फार मोठे बदल झाले आणि महाविद्यालयांच्या वातावरणातही बदल झाले.‘हॉस्टेल डेज’ची कथा हेच बदल अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने,विनोदाच्या अंगाने आणि सकारात्मकरित्या मांडते.

१९९०चे दशक हे मधुर गाण्यांसाठीही ओळखले जाते आणि त्याचमुळे या दशकाला जागणारा ‘हॉस्टेल डेज’ हा एक सांगीतिक चित्रपट आहे.या चित्रपटात एकूण आठ मधुर गाणी आहेत आणि ती आघाडीच्या बॉलिवूड गायकांनी गायली आहेत.सोनू निगम, कुमार सानू, शंकर महादेवन, शान, कुणाल गांजावाला, अवधूत गुप्ते आणि बेला शेंडे यांसारखे आघाडीचे गायक कलाकार त्यासाठी एकत्र आले आहेत.चित्रपटाचे दिग्दर्शक आणि संगीतकर अजय नाईक यांना १९९०च्या दशकातील हा काळ ‘हॉस्टेल डेज’मध्ये त्याचप्रकारची गाणी देवून पुनरुज्जीवीत करायचा होता.या सर्व गायकांनी चित्रपटासाठी गावे अशी त्यांची इच्छा होती. “या दिग्गजांनी जेव्हा गाणी गायला होकार दिला तेव्हा त्याचा आनंद व्यक्त करायला शब्द नव्हते.आघाडीच्या सहा बॉलिवूड गायकांनी एका मराठी चित्रपटासाठी गाण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल,” असे उद्गार अजय नाईक यांनी काढले.त्यांच्याबरोबर मराठीतील आघाडीचे गायक प्रियांका बर्वे, आनंदी जोशी आणि रुचा बोंद्रे यांनीही यातील गाणी गायली आहेत.

नाईक पुढे म्हणाले की,कॉलेज जीवनावर कित्येक यशस्वी चित्रपट आले आहेत आणि जगभरात कित्येक भाषांमध्ये त्यांची निर्मिती झाली आहे.पण हॉस्टेल जीवनावर बेतलेला हा एक आगळा असा चित्रपट आहे.म्हणूनच या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये आत्ताच मोठया प्रमाणावर उत्सुकता लागून राहिली आहे.चित्रपटाचे निर्माते सुभाष बोरा म्हणाले,"बहुआयामी अजय नाईक यांच्या दिग्दर्शनाखालील आमचा पहिला चित्रपट जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ही हॉस्टेलमधील आयुष्यावर बेतलेली गोष्ट आहे.ती १९९० च्या दशकात आकाराला येते.त्यावेळी मोबाईल फोन नव्हते,स्मार्ट फोन नव्हते,केबल टीव्ही नव्हता की डिश टीव्ही नव्हता.इंटरनेट तर नव्हताच नव्हता.त्यामुळेच आयुष्यात खूप मजा होती.हॉस्टेलमधील आयुष्य त्यावेळी आता आहे त्याच्या कीतीतरीपट अधिक आकर्षक होते. म्हणूनच आजच्या प्रेक्षकांना त्यावेळच्या अगदी सोप्या सरळ गोष्टींची आठवण हा चित्रपट पाहताना येईल. हा संगीत चित्रपट त्यातील कर्णमधुर संगीतामुळे रसिकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे."





Web Title: The hostel days will be a trailer for Marathi film trailer, on January 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.